Gold and silver prices touched record highs as investors shifted towards safe-haven assets amid global uncertainty Saam Tv
बिझनेस

सामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! चांदीने ४ लाखांचा टप्पा ओलांडला, सोनेही १६ हजारांनी वाढले, आता काय करायचे; जाणून घ्या?

Gold Silver Prices Hit Record High Amid Global Tensions: सोने आणि चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचा दर 16 हजारांनी वाढला असून चांदी 4 लाखांच्या पुढे गेली आहे.

Omkar Sonawane

सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सुरू असलेली वाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज सोन्याच्या दरात तब्बल 16 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदी तब्बल 21 हजार रुपयांनी महागली 4 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. एकीकडे शेअर बाजारात सतत घसरण पाहायला मिळत असताना दुसरीकडे सोने-चांदीच्या दरात वाढ कायम आहे.

आतापर्यंत सोने दररोज 3 ते 5 हजार रुपयांनी वाढत होते. मात्र आज सोन्याने रेकॉर्ड ब्रेक वाढ केली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर जवळपास 16 हजार रुपयांनी वाढला, तर चांदीत 20 हजार रुपये प्रति किलोची वाढ दिसून आली आहे.

चांदीची चकाकी कायम

MCX वर गुरुवारी मार्च वायदा चांदीचा दर 21,276 रुपयांनी वाढून 4,06,642 रुपये प्रति किलो झाला. आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ चांदीमध्ये झाली आहे. त्याचप्रमाणे 2 एप्रिलला सोन्याचा दर 15,900 रुपयांनी वाढून 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

आठवडाभरात किती वाढ?

21 जानेवारीला MCX वर चांदीचा दर 3.18 लाख रुपये होता, जो आता जवळपास 88 हजार रुपयांनी वाढून 4.05 लाखांच्या पुढे गेला आहे. सोन्याचा दर 21 जानेवारीला 1.60 लाख रुपये होता, जो आता 33 हजार रुपयांनी वाढून 1.93 लाख रुपये झाला आहे.

सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ होण्याचे नेमके कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, वाढते भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढलेली मागणी

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय

पुढील काळात व्याजदर वाढीची शक्यता नसल्याचे संकेत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीने नवीन विक्रम केले आहेत

सोने सुमारे 3% वाढून 5,591.61 डॉलर प्रति औंस

चांदी1.3% वाढून 118.061 डॉलर प्रति औंस

दुसरीकडे आज भारतीय रुपयांचा दर खाली आला तर डॉलरची स्थिती मजबूत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी अंकांनी खाली येत ९२ रुपयांवर पोहोचलाय

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे मौल्यवान धातूंना आधार मिळत असला, तरी सध्या बाजारात मोठी अस्थिरता आहे. त्यांच्या मते, चांदीला 98 डॉलर आणि सोन्याला 5000 डॉलर पातळीवर आधार मिळताना दिसतोय. अमेरिकेतील बेरोजगारीमुळे आणि सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहू शकतात. त्यामुळे नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC News : ठाकरेंचे ते ४ नगरसेवक गेले कुठे? निवडणूक निकालानंतरही बेपत्ता, सस्पेन्स वाढला

Skin Care Routine: मॉइश्चरायझर, सीरम की सनस्क्रीन...; डेली स्किन केअर रुटीन नक्की कशी करायची?

Coconut Ice Cream Recipe : महागडे कोकोनट आईस्क्रीम घरच्या घरी बनवा, फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकी कारणं येणार समोर, ब्लॅक बॉक्स सापडला

Maharashtra Live News Update : ट्रॅव्हल्स अडवून चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT