Gautam Adani Investment in Gujarat  Saam TV
बिझनेस

Gautam Adani: गौतम अदानींचा मास्टर प्लान, गुजरातमध्ये २ लाख कोटींची गुंतवणूक करणार; तरुणांना नोकऱ्या मिळणार

Gautam Adani Investment: पुढील ५ वर्षात अदानी समुह गुजरातमध्ये २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गौतम अदानी यांनी केली आहे.

Satish Daud

Gautam Adani Investment in Gujarat

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुढील ५ वर्षात अदानी समुह गुजरातमध्ये २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं अदानी यांनी सांगितलं आहे. या मोठ्या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये १ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होईल, तसेच हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील, असंही अदानींनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी गुजरातच्या गांधीनगर येथील महात्मा मंदिरात व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ चे उद्घाटन केले. या समिटमध्ये केंद्रातील मंत्र्यांसह जगभरातील मोठे उद्योगपती सहभागी झालेले आहेत. अदाणी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांची देखील समिटमध्ये उपस्थिती होती.

यावेळी गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आगामी ५ वर्षात हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रात २ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या शिखर परिषदेत बोलताना गौतम अदानी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

"श्रीमान पंतप्रधान, तुम्ही एक उज्ज्वल भारताच्या भविष्याचा विचार करत आहात. तुमच्या नेतृत्वाखाली भारत २०४७ पर्यंत पूर्ण विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तुम्ही भारताला एक मोठी शक्ती म्हणून जगाच्या नकाशावर यशस्वीपणे स्थान दिले आहेत", असं अदानी यांनी म्हटलं आहे.

स्वावलंबी भारत बनवण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही मदत करू. कच्छमध्ये जगातील सर्वात मोठे ग्रीन पार्क तयार करून गुजरातमध्ये १ लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देखील अदानी यांनी पंतप्रधान मोदींना दिले.

कच्छमध्ये तयार होणारे २२५ स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले ३० GW क्षमतेचे ग्रीन एनर्जी पार्क अंतराळातूनही दिसेल, असं अदानी यांनी सांगितलं आहे. आम्ही सर्वात मोठी एकात्मिक अक्षय ऊर्जा परिसंस्था तयार करत आहोत. यामध्ये सौर पॅनेल, विंड टर्बाइन, हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स, ग्रीन अमोनिया, पीव्हीसी आणि सिमेंट आणि तांबे उत्पादनाचा विस्तार समाविष्ट आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT