Car Saam Tv
बिझनेस

Car: खड्डा दिसला की हवेत उडणार कार; फीचर्स आणि किंमत किती? जाणून घ्या

Innovative Car Fly In Sky: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रासलेले आहेत. अशातच चीनने खड्डा दिसल्यावर हवेत उडणारी कार बनवली आहे. ही कार हवेत उडते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यामुळे हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...कारण आता खड्डा दिसला की हवेत उडणाऱ्या कारचा शोध लागलाय..ही कार कोणत्या कंपनीने बनवलीय? आणि या कारची किंमत किती?

खड्ड्यावरून उडणारी कार

तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यावरून प्रवास करत असताना खड्डा दिसला की तो चुकवण्यासाठी कार जर हवेत उडाली तर.... तुम्ही म्हणाल हे केवळ स्वप्नातच शक्य आहे.....कारण खड्डा दिसला की कार हवेत कशी उडू शकते... हे कसं शक्य आहे...पण होय हे शक्य आहे.... बीवायडी कंपनीने खड्डा दिसला की तो चुकवून हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक सुपरकारचा शोध लावलाय...बीवायडी यांगवांग यू 9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे... ही कार खड्डा दिसला की अत्यंत वेगाने 6 मीटर लांब हवेत झेप घेते... त्यामुळे तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता....या कारची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात...

ही कार चीनमधील बीवायडी या कंपनीने बनवली आहे

बीवायडी यांगवांग यू 9 सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे

ही कार स्वतःच रोडचं निरीक्षण करुन खड्डा आणि खिळे ओळखू शकते

खड्डा, खिळे किंवा इतर अडथळा असल्यास कार हवेत उडून 6 मीटर झेप घेते

कार 1 टनापेक्षा जास्त ताकदीने हवेत उडते

कंपनीने डीसस एक्स इंटेलिजेंट बॉडी कंट्रोल सिस्टीम बनवली आहे

कारमध्ये 4 वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मोटर दिल्या आहेत

खड्डा दिसला की हवेत उडणारी कार चीनच्या बीवायडी कंपनीने बनवली असली तरी या कारची किंमत अडीच कोटी असणार आहे.. त्यामुळे ही कार स्वप्नवत असली तरी तुमचा खिसा खाली करणारी आहे... त्यामुळे ही कार भारतीय बाजारात कधी येणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT