Motorola G14 Saam Tv
बिझनेस

Flipkart Sale: 50MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज; फक्त 299 रुपयांत घरी घेऊन जा 'हा' स्मार्टफोन

Satish Kengar

Motorola G14:

आजपासून फ्लिपकार्टवर सुपर व्हॅल्यू डेज सेल सुरू झाला आहे. 21 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन जबरदस्त ऑफरसह उपलब्ध आहेत. तसेच, जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर Motorola G14 स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 12,999 रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही 34 टक्के डिस्काउंटनंतर 8,499 रुपयांना हा फोन खरेदी करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनी या फोनवर 7,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. हा फोन 299 रुपयांच्या EMI वर देखील तुम्ही खरेदी करू शकता. (Latest Marathi News)

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी बजेट स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच LCD पॅनल देत आहे. हा डिस्प्ले सेंटर पंच-होल आणि फुल एचडी+ रिझोल्यूशनसह येतो. फोनची सपाट डिझाइन त्याचा लूक अतिशय स्टाइलिश आणि प्रीमियम बनवते. फोन 4 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून यात Unisoc T616 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 20 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 वर काम करतो. कंपनी या फोनला अँड्रॉइड 14 अपग्रेडसह तीन वर्षांसाठी सेफ्टी अपडेट देखील देईल. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT