Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : वडील मनरेगावर घर चालवायचे, ताडपत्रीच्या घरात राहिला, जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS पवन कुमार यांचा प्रवास

Success Story Of IAS Pawan Kumar: उत्तर प्रदेशमधील पवन कुमार यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचे घर मोडकळीस आले होते. छताऐवजी ताडपत्री टाकली होती. अशा परिस्थितीवर मात करुन त्यांनी यश मिळवले.

Siddhi Hande

आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरीही त्यावर मात करुन यश मिळवायचे असते. शिक्षणाला पर्याय नाही, असं म्हणतात. शिक्षणाने तुम्ही सर्वकाही बदलू शकतात. असंच काहीस पवन कुमार यांच्यासोबत झालं. त्यांनी खूप खडतर परिस्थितीत यश मिळवले.

पवन कुमार यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी आहेत. पवन कुमार हे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यांच्या कुटुंबातील लोक रोज कष्ट करुन आपला उदरनिर्वाह करतात. (Success Story Of IAS Pawan Kumar)

पवन कुमार यांच्या घरात सिलिंडर तर होतो मात्र गॅस भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे ते चुलीवर अन्न शिजवायचे. घराची अवस्थादेखील खूप वाईट होती. त्यांच्या घराला छताऐवजी ताडपत्री होती. त्यासाठी पॉलिथिनला वापर केला जातो. खूप गरीब कुटुंबात जन्माला आलेले पवन आता आयएएस टॉपर झाले आहेत. (Success Story)

पवन कुमार यांचे वडील मुकेश मनरेगामध्ये मजुर म्हणून काम करतात. ते मजुरीतून पैसे कमावतात.पवन यांना खूप शिकायचे होते. त्यामुळे त्यांच्या बहि‍णींनीही पैसे कमावण्यासाठी शेतात काम केले. त्यानंतर कोचिंगच्या खर्चासोबत त्यांना ३२०० रुपयांना सेकंडहँड मोबाईल घेतला . त्यानंतर त्यांनी खूप अभ्यास केला. पवन यांनी २०२३ च्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

पवन यांच्या कुटुंबाला उज्जवला योजनेअंतर्गत कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळाला. त्यांचे घर ग्रामीण भागात असल्याने वीजपुरवठा पोहचत नव्हता. त्यांनी नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतले त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर दोन वर्षांच्या कोचिंगनंतर पवन यांनी खूप अभ्यास केला. त्यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT