Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story : प्रिलियम्समध्ये दोनदा फेल, तिसऱ्या प्रयत्नात देशातून पहिली, IAS इशिता किशोर यांची सक्सेस स्टोरी

Success Story Of IAS Ishita Kishore: आयएएस इशिता किशोर यांनी २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं होतं. त्या संपूर्ण देशातून पहिल्या आल्या होत्या.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट असते. विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देताना रात्रदिवस एक करुन अभ्यास करतात. परंतु अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. तरीही प्रयत्न सोडायचे नसतात. असंच काहीसं इशिता किशोर यांच्यासोबत झालं. त्यांनी तिसऱ्या यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

इशिता यांनी यूपीएससी २०२२ परिक्षेत संपूर्ण देशात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यांच्या यशाची गोष्ट ही खूप प्रेरणादायी आहे. इशिता यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केले.त्या नेहमीच अभ्यासात खूपच हुशार होत्या. (Success Story Of IAS Ishita Kishore)

इशिता यांनी लहानपणीच आयएएस अधिकारी व्हायचे ठरवले होते. इशिता यांचे वडील एअरफोर्समध्ये ऑफिसर होते. त्या ग्रेटर नोएडात राहायचे. त्यांनी २०१४ साली १२वीची परीक्षा दिला. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन केले. २०२२ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

इशिता या यूपीएससी परीक्षेत ऑळ इंडिया रँकमध्ये पहिल्या आल्या होत्या.त्यांनी दिवसरात्र एक करुन खूप मेहनत केली. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळाले. इशिता यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु यात प्रिलियम्समध्येच त्यांना अपयश मिळाले. परंतु कितीही अपयश आले तरीही त्या खचल्या नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. तिसऱ्या प्रयत्नात त्या संपूर्ण भारतातून पहिल्या आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT