₹500 and ₹200 currency notes being discontinued from January 1 AI Image
बिझनेस

Bank Update : १ जानेवारीपासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे नेमकं सत्य? वाचा

RBI Bank Update News : १ जानेवारी २०२७ पासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. आरबीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जाणून घ्या या व्हायरल दाव्यामागचे सत्य.

Alisha Khedekar

सोशल मीडियावर सध्या ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये १ जानेवारी २०२७ पासून या दोन्ही नोटा चलनातून बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या दाव्यात तथ्य आहे का? याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

व्हायरल मेसेजमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आरबीआयने असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी या मेसेजवर विश्वास ठेवू नये. दरम्यान, याआधी आरबीआयने २,००० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला होता.

मे २०२३ मध्ये आरबीआयने २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे अनेकांच्या मनात पुन्हा एकदा नोटबंदीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. २,००० रुपयांच्या नोटांबाबत घेतलेला निर्णय आणि सध्या चलनात असलेल्या ५०० व २०० रुपयांच्या नोटा यांचा एकमेकांशी संबंध नाही. या नोटा बंद करण्याबाबत आरबीआयकडून कोणतीही सूचना किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही.

फॅक्ट चेकमध्ये काय आढळले?

१ जानेवारी २०२७ पासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा दावा चुकीचा आहे. आरबीआयने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. पैशांशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील माहिती तपासावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकसाठी सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणात ६ जणांना अटक

Manoj Jarange Patil: एसआयटीकडून मनोज जरांगेंची 2 तास चौकशी; ऑडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह घेतला ताब्यात, नेमकं काय घडलं?

LPG Rules Change: मोठी बातमी! १ डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या बुकिंगचे नियम बदलणार, ग्राहकांनी आताच करा हे काम नाहीतर...

Weather Update: विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज, ५ राज्यांना इशार; ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

SCROLL FOR NEXT