Mahanagar Gas WhatsApp APK file cyber fraud alert : तुमच्या व्हॉट्सॲपवर महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) नावाने एखादा मेसेज आला आहे का? त्यामध्ये गॅस बिल भरण्यासाठी किंवा मीटर अपडेट करण्याच्या बहाण्याने एखादी ॲप फाईल (.APK) डाऊनलोड करण्यास सांगितले आहे? जर असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हा एक मोठा सायबर फ्रॉड आहे. या माध्यमातून नागरिकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीआर (DGIPR) विभागासह महानगर गॅस लिमिटेडने प्रत्यक्ष 'फॅक्ट चेक' करून हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे.
सायबर भामटे कशी करत आहेत फसवणूक?
सायबर गुन्हेगार MGL चे अधिकारी बनून ग्राहकांना मेसेज किंवा कॉल करतात. तुमचे गॅस बिल अपडेट केलेले नाही, त्यामुळे आज रात्री तुमचे गॅस कनेक्शन तोडले जाईल, अशी भीती ग्राहकांना दाखवली जाते. त्यानंतर गॅस मीटर अपडेट करण्याच्या बहाण्याने व्हॉट्सॲपवर एक .APK फाईल पाठवली जाते.
ग्राहकांनी ती फाईल फोनमध्ये डाऊनलोड करताच, सायबर चोरट्यांना मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस मिळवतात आणि बँक खात्यातील पैसे काढून घेतात.
महानगर गॅसने (MGL) आपल्या सर्व ग्राहकांना याबाबत सावध केले आहे. कंपनी कधीही व्हॉट्सॲपवर अशा प्रकारच्या .APK फाईल्स डाऊनलोड करायला सांगत नाही. अथवा अनोळखी नंबरवरून कनेक्शन तोडण्याची धमकी देत नाही. अशा कोणत्याही अनधिकृत मेसेजवर किंवा कॉलवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे महानगर गॅसकडून सांगण्यात आले आहे.
महानगर गॅस कंपनीसोबत संपर्क करायचाय?
कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास ग्राहकांनी फक्त MGL च्या अधिकृत क्रमांकावरच संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीकडून कऱण्यात आले आहे.
अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक: +91-98992 03843
कस्टमर केअर (ग्राहक सेवा): 022 6867 4500 / 022 6156 4500
अधिकृत ईमेल: support@mahanagargas.com
महत्त्वाची टीप: कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली फाईल डाऊनलोड करू नका आणि फोनवर आलेला ओटीपी (OTP) किंवा बँकेची माहिती कोणासोबतही शेअर करू नका. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.