E30 FUEL BY 2030? FACT CHECK OF VIRAL CLAIM AFTER E20 ROLLOUT saam tv
बिझनेस

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Fact-Check: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.आता E20 नंतर E30 आणण्याची तयारी सरकार करतंय असा दावा करण्यात आलाय. पुढील 5 वर्षात E30 वापरासाठी येणार असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय.पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का.याची आम्ही पडताळणी केली,त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

आता सरकार E30 ची तयारी करत असल्याचा दावा केल्याने खळबळ उडालीय.सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल होतोय.E20 मुळे सध्या देशभरात गोंधळ निर्माण झालाय...अनेकांनी गाड्या खराब झाल्याचा आरोप केलाय...आणि सरकार आता E30 आणण्याचा विचार करत असेल तर हे प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.पण, या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

सरकारने पुढील 5 वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य 30% पर्यंत वाढवलं ​​आहे. सरकार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवलंय. हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली.कारण, हा विषय देशभरातील वाहनचालकांचा आहे.सध्या E20 वरून अनेकांनी गडकरींवर निशाणा साधलाय.

CJP सारखीच E20 पार्टीही तयार करण्यात आलीय, असं असतानाही खरंच सरकार पुढील 5 वर्षात E30 आणण्याचा विचार करतंय का.? याची माहिती मिळवली. त्याआधी E30 म्हणजे 30% इथेनॉल आणि 70% पेट्रोल असतं..पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय हा हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी केली.याबाबत सरकारकडून माहिती मागवली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

-व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

इथेनॉल वाढवण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही

2030 पर्यंत 30% इथेनॉल मिश्रणाचा दावा खोटा

E30 साठी सध्या पेट्रोलच्या गाड्या अनुकुल नाही

2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य होतं

इथेनॉलच्या वापरामुळे इथेनॉल उत्पादनात शेतकऱ्यांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील हे खरं आहे...पण इथेनॉलचा अधिकचा वापर सगळ्याच वाहनांना चालणारा नाहीये.सध्याच्या पेट्रोल गाड्या फक्त E20 पर्यंतच्या इंधनासाठीच अनुकूलित केलेल्या आहेत.त्यामुळे अजून इथेनॉलची मात्रा वाढवली तर वाहनांवर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे सरकारने आता E30 ची तयारी केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

बँकांचा खातेदारांच्या 26 हजार कोटींवर डल्ला; किमान शिल्लकच्या नावाखाली वसुली

SCROLL FOR NEXT