Government Schemes Saam Tv
बिझनेस

Government Scheme: मुलीसाठी पैसे जमा करताय? मग आताच 'या' सरकारी योजनेत गुंतवा, खात्यात जमा होतील ७० लाख; नशीब चमकेल

Government Schemes for Girls with best returns: सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी खाते उघडता येते. या योजनेत दरवर्षी किमान २५० रूपये ते जास्तीत जास्त १.५ लाख रूपये गुंतवणूक करता येते.

Bhagyashree Kamble

राज्य सरकारसोबतच केंद्र सरकार देखील देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात. याचा आर्थिकदृष्ट्या फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतो. केंद्र सरकारकडून मुलींसाठी देखील एक उत्तम योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचं नाव सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेवर आपल्या वार्षिक ८ टक्के व्याज मिळते. या योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी ही योजना परिपक्व होते.

मुलींसाठी खास योजना

सुकन्या समृद्धी योजना केवळ मुलींसाठी चालवली जाणारी योजना आहे. तुम्ही जर १० वर्षांखालील मुलीचे पालक असाल तर, आपण या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत किमान २५० रूपयांपासून जास्तीत जास्त १.५ लाख रूपयांपर्यंत गुंतवू शकता. या योजनेत गुंतवणूक १० वर्षांसाठी करवी लागते. तसेत २१ वर्षांनी ही योजना परिपक्व होते. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींसाठी खाते उघडता येते.

मॅच्युरिटीवर ४६,७७,५७८ रूपये व्याज मिळेल

आपण कोणत्याही बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावानं खाते उघडू शकता. बँकांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलीसाठी पोस्ट ऑफिसमध्येही खाते उघडू शकता. जर तुम्ही या योजनेअंतर्गत दरवर्षी १.५ लाख रूपये गुंतवले.

तर, १५ वर्षात तुमच्या खात्यात २२,५०,००० रूपये जमा होतील. २१ वर्षांनी मॅच्युरिटी पिरिअडनंतर मुलीच्या खात्यातून आपल्याला ६९,२७, ५७८ रूपये व्याजासकट काढता येईल. म्हणजेच २१ वर्षांनंतर ४६,७७, ५७८ रूपये व्याज मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT