EPFO WhatsApp Service meta ai
बिझनेस

PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

EPFO Big Update: EPFO लवकरच WhatsApp आधारित सेवा करू शकते. पीएफ बॅलन्स, क्लेम स्टेटस, केवायसी आणि व्यवहारांची माहिती मोबाईलवर मिळेल, तसेच बनावट नंबरपासून सावध राहा.

Sakshi Sunil Jadhav

EPFO सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO लवकरच WhatsApp आधारित सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून सदस्यांना PF खात्याशी संबंधित अनेक प्राथमिक माहिती आणि सेवांचा लाभ मोबाईलवरच घेता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारंवार EPFO वेबसाइटवर लॉगिन करणे, कॉल सेंटरशी संपर्क साधणे किंवा कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊ शकते.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मे महिन्यात EPFO कडून सदस्यांसाठी whatsapp आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्याची योजना असल्याची माहिती दिली होती. तसेच व्यवस्थेत सदस्य EPFO च्या अधिकृत आणि व्हेरिफाइड WhatsApp नंबरवर ‘Hello’ असा मेसेज पाठवून सेवा सुरू करू शकतील.

WhatsApp वर कोणत्या सुविधा मिळू शकतात?

या प्रस्तावित सेवेमध्ये PF बॅलन्स तपासणे, अलीकडील पाच व्यवहारांची माहिती मिळवणे, EPF क्लेमचा स्टेटस पाहणे, KYC संदर्भातील मदत घेणे आणि EPF खात्यात जमा झालेल्या व्याजाची माहिती मिळवणे यांचा समावेश असू शकतो. तसेच UAN संबंधित प्रश्न, सामान्य तक्रारी आणि रखडलेल्या कामांसाठी अलर्टही मिळण्याची शक्यता आहे.

ही सेवा AI आधारित चॅटबॉट आणि EPFO च्या डेटाबेसच्या मदतीने काम करण्याची शक्यता आहे. सदस्यांनी WhatsApp वरून ‘Hello’ पाठवल्यानंतर त्यांच्या UAN शी लिंक असलेल्या मोबाईल नंबरची पडताळणी केली जाऊ शकते. त्यानंतर उपलब्ध सेवांमधून आवश्यक पर्याय निवडता येईल.

WhatsApp फसवणुकीपासून सावध राहा

ही सेवा अद्याप सर्व सदस्यांसाठी उपलब्ध झालेली नाही. काही EPFO प्रादेशिक कार्यालयांकडून स्वतंत्र WhatsApp हेल्पलाइन सुरू आहेत. त्यामुळे कोणताही अनोळखी नंबर अधिकृत समजू नका.

EPFO ने सदस्यांना UAN पासवर्ड, Aadhaar, PAN, बँक खाते तपशील किंवा OTP कोणालाही WhatsApp, कॉल किंवा सोशल मीडियावर शेअर करू नये, असा इशारा दिला आहे. दरम्यान, WhatsApp सेवा उपलब्ध होईपर्यंत सदस्य PF बॅलन्ससाठी नोंदणीकृत मोबाईलवरून 9966044425 वर मिस्ड कॉल देऊ शकतात. तसेच ‘EPFOHO UAN’ असा SMS 7738299899 वर पाठवूनही तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : ३६ किलोमीटर लांब भिंत! 'या' किल्ल्याची भव्य रचना पाहून व्हाल थक्क

Railway Rules: कुटुंबीयांची बर्थ वेगवेगळ्या डब्यात मिळाल्यास सीट बदलता येते का? काय आहे रेल्वेचा नियम

Maharashtra News Live Update: कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा

काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना अटक; राजकारणात खळबळ

Wednesday Horoscope : पैसा, धनलाभ आणि प्रगतीचा योग! ‘या’ ७ राशींवर लक्ष्मीची कृपा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT