epfo update meta ai
बिझनेस

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

PF Withdrawal : EPFO ने पीएफ क्लेम प्रोसेस जास्त जलद केली असून आता बहुतांश दावे दोन दिवसांमध्ये निकाली निघतील. लवकरच यूपीआयच्या मदतीने खात्यात रक्कम जमा होणार असून सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सेवांमध्ये सतत सुधारणा करत आहे. आता पीएफ खात्यातले पैसे काढण्याची प्रोसेस आधीपेक्षा जलद आणि सोपी होणार आहे. ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त (CPFC) रमेश कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या दाव्यांचे जवळपास संपूर्ण काम पूर्ण झालं आहे. आता ऑनलाइन क्लेम केल्यानंतर बऱ्याच प्रकरणांमध्ये फक्त ४८ तासांच पीएफची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या नव्या सुविधेमुळे लाखो कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार असून क्लेम प्रोसेस सोपी होणार आहे. त्यामुळे पीएफ सदस्यांना स्वत: चे पैसे मिळण्यासाठी अनेक दिवस किंवा आठवडे वाट पाहावी लागणार नाही.

रमेश कृष्णमूर्ती यांनी सांगितलं की, नवीन प्रणालीमुळे ९० टक्के दावे ऑटो-सेटलमेंटच्या मदतीने मंजूर होत आहेत. त्यामुळे दाव्यांची प्रोसेस जास्त जलग झाली असून पीएफमधून पैसे काढणं आता म्युच्युअल फंडातील रक्कम काढण्याइतकंच नाही तर त्याहूनही जास्त सोपं झालं आहे. या सुधारणांमुळे कर्मचारी आणि नियोक्ते दोघांचाही वेळ वाचणार आहे.

EPFO आता नियमांचं पालन जास्त सोपं करण्यावर भर देत आहे. नियोक्त्यांसाठी प्रोसेस सोपी करणं आणि कर्मचाऱ्यांना जागतिक दर्जाच्या सेवा देणं हे संस्थेचे प्रमुख उदिष्ट असल्याचंही कृष्णमूर्ती यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच EPFO लवकरच BHIM अॅपच्या मदतीने पीएफ क्लेम सेटलमेंटची सुविधा सुरू करणार आहे. या सुविधेमुळे मंजूर झालेली रक्कम थेट सदस्यांच्या UPI-लिंक्ड बँक खात्यात जमा केली जाईल. पुढील एका महिन्याच्या आता ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.

कृष्णमूर्ती यांनी गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स, डिलिव्हरी बॉय तसेच असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनाही सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरकार नवीन सामाजिक सुरक्षा योजनेवर काम करत असल्याची माहिती दिली. तसेच EPFO च्या व्याजामध्ये वाढ करण्यासोबत सध्या कोणताही निर्णय झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या EPFO वर ८.२५ टक्के व्याज दिलं जात असून ३ जुलैपर्यंत ३४ कोटींपेक्षा जास्त सदस्यांच्या खात्यांमध्ये १.४४ लाख कोटी रुपयांचं व्याज जमा करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT