EPFO Employees’ Enrolment Campaign 2026: Eligibility, Benefits & Registration AI Image
बिझनेस

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

EPFO New Update News : EPFO Employees’ Enrolment Campaign 2026 अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याची संधी. PF, EPS आणि EDLI लाभ, पात्रता, UAN प्रक्रिया आणि ऑनलाइन नोंदणीची माहिती जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

  • EPFO ने Employees’ Enrolment Campaign 2026 ही विशेष मोहीम सुरु केली

  • ही मोहीम २९ जून २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवली जात आहे.

  • पात्र कर्मचाऱ्यांना EPF, EPS पेन्शन आणि EDLI विमा संरक्षण यांसारखे फायदे मिळू शकतात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कंपन्या आणि नियोक्त्यांसाठी Employees’ Enrolment Campaign 2026 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश असा आहे की, काही कारणास्तव पूर्वी EPFO मध्ये सामील होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांना EPF , पेन्शन (EPS) आणि विमा (EDLI) यांसारख्या सुविधा देणं.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, कंपन्यांना त्यांच्या जुन्या रोजगार नोंदी दुरुस्त करून पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याची ही एक विशेष संधी आहे. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर कारवाई आणि दंडाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ही मोहीम २९ जून २०२६ पासून सुरू झाली असून कंपन्यांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करता येणार आहे. या मोहिमेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली नाही अशा कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचारी दिलेल्या कालावधीत कंपनीत कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच माहिती देताना कर्मचारी जिवंत आणि संबंधित कंपनीमध्ये सक्रिय नोकरीत असणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या मागील PFमध्ये काही चुका असल्यास, योजनेतील तरतुदींनुसार कंपन्यांना काही प्रशासकीय सवलती मिळू शकतात.

ऑनलाइन नोंदणी कशी करायची?

  1. सगळ्यात आधी कंपनीला कर्मचाऱ्याची सॅलरी संबंधित माहिती तपासून पात्र कर्मचाऱ्यांची माहिती निश्चित करावी लागेल.

  2. त्यानंतर UMANG App च्या माध्यमातून Face Authentication वापरून कर्मचाऱ्याचा UAN तयार करण्याची प्रक्रिया केली जाईल.

  3. UAN तयार झाल्यानंतर कंपनीला EPFO च्या ECR प्रणालीद्वारे आवश्यक PF योगदान जमा करावे लागेल.

  4. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येणार असून भौतिक कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.

  5. या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांना PF बचतीवरील व्याज, भविष्यातील पेन्शन आणि विमा संरक्षणाचा फायदा मिळू शकतो.

  6. तर कंपन्यांना जुन्या नोंदी दुरुस्त करून अनुपालनातील त्रुटी दूर करण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'धनुष्यबाण'

Ladki Bahin Yojana: जुलै - ऑगस्टचे ३,००० रुपये खात्यात कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ई-केवाईसीवर दिली मोठी अपडेट

Sugar Substitutes: साखरेच्या जागी आजचं खाण्यास सुरुवात करा हे 5 पदार्थ; वजन आणि शुगर दोन्ही राहील कंट्रोलमध्ये

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

SCROLL FOR NEXT