Alisha Khedekar
वय वाढल्यानंतर गुडघ्यांतील झीज वाढते. त्यामुळे जिने चढताना-उतरताना वेदना, कडकपणा आणि हालचालींमध्ये त्रास जाणवू शकतो.
सांधे झिजल्यास हाडांमध्ये घर्षण वाढते. परिणामी चालताना, बसताना किंवा जिने चढताना गुडघेदुखी जाणवते.
गुडघ्याच्या वाटीभोवती वेदना होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. जिने चढताना किंवा बराच वेळ बसल्यानंतर त्रास वाढू शकतो.
गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाल्यास वेदना, सूज आणि अस्थिरता जाणवू शकते. जिन्यावर वजन देताना त्रास अधिक जाणवतो.
गुडघ्यातील मेनिस्कसला इजा झाल्यास वाकताना वेदना, सूज किंवा गुडघा अडकण्यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
गुडघ्याच्या स्नायूंना हाडांशी जोडणाऱ्या टेंडनमध्ये सूज आल्यास वेदना होऊ शकतात. जिने चढताना गुडघ्यावर ताण वाढतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा