EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

EPFO Interest Rules News : नोकरी गेली तरी PF खात्यावर व्याज मिळत राहणार आहे. EPFO च्या नियमांनुसार ५८ व्या वर्षांपर्यंत पीएफ खात्यावर व्याज जमा होत राहते, त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Alisha Khedekar

  • EPFO ने PF व्याजाबाबतचा गैरसमज दूर केला

  • नोकरी गेली तरी ५८ वर्षांपर्यंत व्याज मिळणार

  • पूर्वीची निष्क्रियतेची मर्यादा रद्द

  • बेरोजगारीच्या काळात आर्थिक सुरक्षिततेस मदत

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) नेहमीच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. मात्र खासगी क्षेत्रात काम करताना कर्मचाऱ्यांना नेहमी भीती असते ती म्हणजे, नोकरी सोडल्यानंतर किंवा नोकरीवरून काढून टाकल्यावर देखील त्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा होईल का? हा प्रश्न कायम कर्मचाऱ्यांना पडतो या प्रश्नाचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने निरसन केलं आहे.

पूर्वीच्या नियमांनुसार, खासगी कंपनीतील नोकरी गेल्यावर किंवा नोकरी सोडल्यावर पुढील तीन महिने पगार आला नाही तर व्याज सुरु राहतं. आणि त्यांनतर तो व्याज येणं बंद होते. मात्र ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार आता नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे. ईपीएफओने म्हटलं आहे की, नोकरी गेली तरी पीएफ खात्यात व्याज मिळत राहतं.

हे व्याज वयाच्या ५८ वर्षांपर्यंत चालू राहतं. म्हणजे, तुम्ही ५८ वर्षांचे होईपर्यंत, खात्यात कितीही वर्ष पैसे आले नाहीत, तरी व्याज जमा होत राहतं. हे नियम ईपीएफओने स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही ४० वर्षांचे असाल आणि नोकरी सोडली असेल, तर पुढील १८ वर्ष व्याज मिळेल. हे व्याज दरवर्षी निश्चित दराने जमा होतं.

ज्यामुळे तुमच्या खात्यातील पैसा वाढतो. यामुळे कर्मचाऱ्यांना बेरोजगार काळातही आर्थिक स्थिरता मिळते. २०१६ मध्ये सरकारने ईपीएफ नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. यापूर्वी तीन वर्षांच्या निष्क्रियतेच्या नियमामुळे व्याज थांबण्याची शक्यता होती, पण या सुधारणेनंतर ही मर्यादा काढून टाकली गेली.

दरम्यान तुमचे पीएफ खाते सक्रिय ठेवण्यासाठी वारंवार तपासणी करा. व्याज मिळत राहावा यासाठी ५८ वर्षांपर्यंत पैसे काढू नका, जेणेकरून कंपाउंडिंगचा फायदा मिळेल. जर तुम्ही नवीन नोकरीत रुजू झालात, तर जुने खाते नवीन खात्याशी जोडा. ईपीएफओच्या वेबसाइट किंवा अॅपवर खाते तपासा. हे नियम कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देतात, विशेषतः बेरोजगारीच्या काळात तुम्हाला याची मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT