PF Interest Rate Saam Tv
बिझनेस

PF Rules: नोकरी सोडल्यावर किती वर्षे PF च्या पैशांवर व्याज मिळते? वाचा नियम काय सांगतो

PF Interest Rules: पीएफ खात्यात दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते. दरम्यान, जर तुमची नोकरी गेली असेल तर तुम्हाला किती दिवस पीएफ खात्यावर व्याजदर मिळते ते जाणून घ्या.

Siddhi Hande

नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच. तुमच्या दर महिन्याच्या पगारातून ठरावीक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. यातील काही रक्कम ही कर्मचारी आणि काही रक्कम कंपनी कमा करते.दरम्यान, परंतु कधीतरी काहीतरी कारणांनी आपली नोकरी जाते. यावेळी पीएफ खात्यात जमा असणाऱ्या पैशांवर व्याजदर मिळते की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

जर तुम्ही नोकरी सोडली तरीही तुमचे पीएफ अकाउंट सुरु राहते. दुसऱ्या ऑफिसरमधून मिळणाऱ्या पगारातील रक्कम या पीएफ खात्यात जमा केली जाते. परंतु नोकरीच करत नसाल तर पीएफ खात्यातील रक्कमेवर व्याजदर मिळते का असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, ईपीएफओने यासाठी काही नियम आणि अटी निश्चित केल्यात आहे. या नियमांचे पालन केल्यावर तुम्हाला भविष्यात अडचणी येणार नाही. नियमांनुसार, पीएफमधील जमा झालेल्या रक्कमेवर व्याजदर मिळते. पीएफ खाते हे सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रायलयाद्वारे ऑपरेट केले जाते.

EPFO सदस्यांसाठी काय आहे नियम? (EPFO Rule For PF Withdrawal)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ मेंबरशिपसाठी माहिती दिली आहे. यामध्ये ईपीएफ मेंबरशिपसाठी कोणतेही बंधन नाही. कंपनी सोडल्यानंतरही तुम्ही ईपीएफ मेंबर असू शकते. दरम्यान, जर पीएफ खात्यात काही काळाने दर महिन्याला पैसे जमा होणे बंद झाले तर कालांतराने हे व्याजदर मिळणे बंद होते.

जर नोकरी नसेल तर पैसे काढू शकतात का?

पीएफ योजनेतील गुंतवणूक ही फायदेशीर असते. तुमच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. कंपनीकडूनही तेवढेच पैसे जमा केले जातात. यावर व्याजदरदेखील मिळते. परंतु जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली असेल तो बेरोगजगार असेल तो पैसे काढू शकतात. जर तो व्यक्ती एका महिन्यासाठी बेरोजगार असेल तर ७५ टक्के रक्कम काढू शकतो. २ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल तर सर्व पैसे काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलक पुन्हा आक्रमक

MPSC Recruitment : 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर; अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार? सविस्तर माहिती

Side Effects Of Onion: रात्री कांदा का खाऊ नये? कारण जाणून घ्या

Accident: क्षणात भयंकर घडलं! दादरमध्ये सलमान खानच्या अंगावर झाड पडलं

माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अडचणीत वाढ; 20 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी|VIDEO

SCROLL FOR NEXT