EPFO PF Interest Update google
बिझनेस

PF Interest : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याज खात्यात जमा झाले नाही? २ मिनिटांत करा चेक; वाचा प्रोसेस

EPFO PF Interest Update : पीएफ खात्यात व्याज जमा झाले नसेल तर घाबरू नका. ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार कशी करायची, हेल्पलाइन क्रमांक आणि समस्या सोडवण्याची संपूर्ण माहिती इथे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष २०२५ - २६ साठी पीएफ खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक सदस्यांना त्यांच्या मोबाईलवर व्याज जमा झाल्याचे मेसजही येतो. पण काही सदस्यांच्या खात्यात अद्याप व्याज जमा झालेलं नाही किंवा त्यांना कोणताही मेसेजही मिळालेला नाही. अशा सदस्यांनी घाबरण्याची गरज नाही. ईपीएफओकडे ऑनलाइन तक्रार निवारण करता येते.

जर तुमच्या pf खात्यामध्ये व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत तक्रार निवारण पोर्टलवर जा. तिथे Register Grievance या पर्यायावर क्लिक करून तक्रार नोंदवता येते. पुढे PF सदस्य, EPF पेन्शनधारक, नियोक्ता आणि इतर असे पर्याय दिसतील.त्यातला योग्य पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर तक्रारीचे कारण स्पष्टपणे लिहून अर्ज सादर करावा. तक्रार नोंदवल्यानंतर तिची स्थितीही ऑनलाइन पाहता येतो.

ऑनलाइन तक्रार केल्यानंतरही वेळेत तोडगा निघाला नाही, तर ईपीएफओच्या हेल्पलाइनची मदत घेता येते. यासाठी १९९७० किंवा १८००-११८-००५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येतो. तसेच संबंधित प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयामध्ये जाऊन लेखी तक्रारही देता येते.केंद्र सरकारच्या पीजी पोर्टलवरूनही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून केलेल्या तक्रारींची सुविधा विभागाकडून नियमित पाहणी केली जाते आणि त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाते.

ईपीएफ खात्यातले व्याज वेळेवर जमा होणे प्रत्येक सदस्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे व्याज जमा झालं की नाही, याची वेळोवेळी खात्री करून घ्यावी. जर कोणतीही अडचण आली, तर लगेचच अधिकृत पोर्टल किंवा हेल्पलाइनचा वापर करून तक्रार नोंदवावी. त्यामुळे तुमच्या समस्या सोडवण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संभाजीनगरमध्ये हायकोर्ट टायपिंग परिक्षेत गोंंधळ दिपके आंदोलनस्थळी

साधी गव्हाची चपाती खाऊन मुलं कंटाळली? ट्राय करा ‘या’ 6 हेल्दी रेसिपी

पावसाचा हाहाकार! महाराष्ट्र्रासह अनेक राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला इशारा

ट्रम्पमुळे लोकांची दारू पिण्याची क्षमता वाढली; विखें पाटलांचं पुन्हा अजब विधान

VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉक

SCROLL FOR NEXT