EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO News: EPFO वेबसाइटवरुन ऑनलाइन पैसे काढणे झाले सोपे; अशा पद्धतीने करा अर्ज

EPFO: भारतीय कामगार मंत्रालयाद्वारे संचलित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही महत्त्वाची आर्थिक सुविधा आहे. या योजनेत नागरिक भविष्यासाठी काही रक्कमेची बचत करु शकता.यातील पैसे आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे काढू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How to Withdraw Money From EPFO Account Online:

देशातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे EPFO मध्ये खाते असते. आपल्या भविष्याची सुरक्षितता करण्यासाठी यात बचत केली जाते. भारतीय कामगार मंत्रालयाद्वारे संचलित कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही महत्त्वाची आर्थिक सुविधा आहे. या योजनेत नागरिक भविष्यासाठी काही रक्कमेची बचत करु शकता. आता तुम्ही EPFO खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे काढू शकता. आधी EPFO खात्यातून पैसे काढण्यासाठी खूप मोठी प्रोसेस होती. त्यानंतर आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे काढू शकता. त्यासाठी तुम्हाला EPFO वेबसाइटवर जाऊन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. (Latest News)

EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर तुमच्या खात्यात लॉग इन करा. यासाठी तुम्हाला तुमचे नाव आणि पासवर्ड टाकावा लागेल.

तुम्ही वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर तुमच्या खात्यावर जाण्याचा पर्याय मिळेल. तिथे तुम्ही Considered Dashboard वर क्लिक करा.

डॅशबोर्डवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन क्लेम (मेंबर) हा पर्याय निवडावा लागेल.

ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला Withdraw Money च्या पर्यायावर क्लिक करावे लागले. यानंतर आवश्यक ती माहिती भरावी लागेल. यात तुम्हाला बँकेची माहिती, आधार नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल.

आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला ही माहिती सबमिट करावी लागेल. यानंतर तुम्हाला एक नंबर पाठवला जाईल. तुमची रिक्वेस्ट मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाईल.

पैसे काढल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करा.

या सोप्या पद्धतीने तुम्ही EPFO वेबसाइटवरुन तुमचे पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

SCROLL FOR NEXT