EPFO WhatsApp service saam tv
बिझनेस

EPFO WhatsApp Service : WhatsApp वर 'Hi' पाठवूनही PF माहिती मिळेना; EPFO ची नवी सेवा पहिल्याच दिवशी कोलमडली

PF Balance Check : EPFO ची WhatsApp सेवा सुरू होताच पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO सदस्यांसाठी महत्तावाची बातमी आहे. आता पीएफ बॅलन्स, अलीकडचे व्यवहार आणि पासबुकची माहिती थेट तुमच्या WhatsApp वर मिळावी यासाठी EPFO ने नवीन सेवा सुरू केलीये. पण ही सेवा सुरू झाल्यानंतर काही तासातच अनेक सदस्यांनी ती व्यवस्थित काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे नवीन सुविधेचा लाभ घेण्यापेक्षा सदस्यांना तांत्रिक अडचणींचा समस्येला सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीत ही सेवा कशी वापरायची आणि WhatsApp वर रिप्लाय मिळत नसेल तर काय करायचं हे जाणून घेऊयात.

EPFO ची WhatsApp सेवा काय आहे?

तर EPFO च्या WhatsApp सेवेमुळे सदस्यांना घरबसल्या पीएफ खात्यातले शिल्लक किंवा जमा रक्कम आणि शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिळते. त्यामुळे सतत EPFO ऑफिसला जाण्याची गरज नाही. आधी प्रोसेस खूप मोठी आणि वेळखाऊ होती. मात्र त्यामध्ये आता बदल झालाय.

सेवा चालत नसेल तर काय करावे?

काही कर्मचाऱ्यांना WhatsApp वर रिप्लाय मिळत नसेल्याच्या तक्रारी जाणवत आहेत. अशावेळी काही परत थोड्यावेळाने परत प्रयत्न करून कर्मचारी त्यांची माहिती मिळवू शकतात. तसेच UMANG अॅप किंवा EPFO च्या अधिकृत पोर्टलवरून पीएफ खात्याची माहिती तपासा.

WhatsApp वर PF बॅलन्स कसा तपासायचा?

WhatsApp वर PF बॅलन्स तपासण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. सर्वप्रथम +91 8796441800 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा. WhatsApp उघडून या नंबरवर 'Hi' हा मेसेज पाठवा. स्क्रीनवर दिसणाऱ्या मेन्यूमधून तुम्हाला हवी ती भाषा निवडा. त्यानंतर पीएफ बॅलन्स, व्यवहार किंवा पासबुकचा पर्याय निवडा.

त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती पाठवली जाते. पण पहिल्याच दिवशी ही सुविधा काम करत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. त्यातच पीएफच्या नियमात मोठे बदल झालेले पाहायला मिळतायेत. अशात कर्मचाऱ्यांना त्यांचा पीएम किती जमा झालाय हे तपायचं आहे. आता पुर्वी सारखंच EPFO ऑफीसमध्ये जाऊन चौकशी करावी लागणार हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Accident : रेल्वेचा भीषण अपघात! इंजिनशिवाय ६ किलोमीटर धावले ७ डब्बे; पाहा Video

Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Junk Food Risks : चिप्स-बर्गरची सवय मुलांच्या मेंदूला करतेय खिळखिळी, नवीन संशोधनातील धक्कादायक माहिती

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

दिवाळीची साफसफाई पडली महागात! ॲपवरून बोलावलेल्या कामगारांनी सोने-चांदीवर मारला डल्ला, मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT