EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO: सेल्फीद्वारे अ‍ॅक्टिव्ह करता येणार UAN नंबर; EPFOने सुरु केली फेस आयडी सर्व्हिस

EPFO UAN Activation: ईपीएफओ सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या यूएएन नंबर जनरेट करु शकणार आहात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने सेल्फीद्वारे यूएएन नंबर जनरेट करता येणार आहे.

Siddhi Hande

सेल्फी काढून जनरेट करता येणार यूएएन नंबर

EPFO ची नवीन सुविधा

यूएएन नंबर काढण्यासाठी नियोक्त्याची गरज नाही

ईपीएफओ सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ आता सर्व सुविधा डिजिटल करत आहे.ईपीएफओने सर्वकाही डिजिटल करण्याकडे अजून एक पाऊल उचलले आहे. आता ईपीएफओने फेस ऑथेंटिकेशन टेक्नोलॉजीवर आधारित नवीन सुविधा सुरु आहेत. आता या नवीन टेक्नोलॉजीद्वारे कर्मचारी फक्त सेल्फी घेत त्यांचा यूएएन नंबर तयार करु शकतात.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांकडे यूएएन नंबर असतो. हा नंबर प्रत्येक कर्मचाऱ्याचा वेगवेगळा असतो. या नंबरशिवाय पीएफ खात्यात तुमचे पैसे जमा होत नाही. दरम्यान, आता युनिव्हर्सल अकांट नंबर जनरेट करणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही फक्त काही मिनिटांत यूएएन नंबर तयार करु शकतात.

ईपीएफओचे रिजनल कमिश्नर हेमंत कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. याआधी कर्मचाऱ्यांना यूएएन नंबर तयार करण्यासाठी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतां. अनेकदा या कामाला उशिर होतो. चुकीची माहिती टाकल्यानंतर तुम्हाला अनेकदा सरकारी ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागायच्या. दरम्यान, आता ही सर्व झंझट संपणार आहे. आता ईपीएफओने सेल्फ यूएएन जनरेशन सुविधा सुरु केली आहे.

UAN नंबर होणार अॅक्टिव्ह (UAN Number Activation Process)

ईपीएफओचे कमिश्नर हेमंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्यवस्थेत कर्मचारी आपल्या आधारशी जोडलेल्या फेस आयडीवरुन यूएएन बनवू शकतात. याासठी आता कंपनीची परवानगी घ्यायची गरज नाही. यूएएन नंबर डायरेक्ट अॅक्टिव्ह होणार आहे. यामुळे तुमचे पीएफ खाते उघडणे खूप सोपे होणार आहे. हे सर्व काम ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे काही मिनिटांतच कर्मचारी नियोक्त्याशिवाय यूएएन नंबर जनरेट करु शकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT