EPFO Latest News saam tv
बिझनेस

EPFO SWP Plan : EPFO चा मोठा दिलासा! रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार 'पगार'; SWP प्लॅनमुळे PF चे पैसे काढणेही सोपे

EPF Monthly Withdrawal : पीएफ खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. SWP प्लॅनमुळे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना पीएफची रक्कम एकरकमी काढण्यापेक्षा मासिक पद्धतीने काढता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

नोकरीतून रिटायर झाल्यावर दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळावं, अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. पण रिटायरमेंटनंतर पीएफची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढल्यावर भविष्यात पैशांचं नियोजन करणं कठीण होऊ शकतं. आता अशा कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EPFO च्या सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनला (SWP) मंजुरी देण्यात आली आहे. या सुविधेमुळे रिटायर कर्मचाऱ्यांना पीएफमधली जमा असलेली एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार आहे.

१. SWP प्लॅन म्हणजे नेमके काय?

SWP म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन असतो. यामध्ये रिटायर झालेले कर्मचारी त्यांची संपूर्ण पीएफची रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी ठरावीक कालावधीनंतर थोडी-थोडी रक्कम काढू शकतील. यामध्ये मासिक, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने पैसे काढण्याचा पर्याय असेल. महत्त्वाचं म्हणजे, खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहणार आहे.

२. कोणाला मिळणार या सुविधेचा फायदा?

श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि पीएफ खात्यात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असलेल्या ६.३२ लाख सदस्यांना याचा प्राथमिक लाभ मिळू शकतो. भविष्यात निवृत्त होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठीही ही सुविधा फायदेशीर ठरू शकते.

३. EPS पेन्शन आणि SWP मध्ये काय फरक?

SWP मुळे कर्मचाऱ्यांची मासिक पेन्शन बंद होणार नाही. कर्मचारी पेन्शन योजना (EPS) आणि SWP या दोन वेगळ्या सुविधा आहेत. EPS अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार मासिक पेन्शन मिळते. तर SWP मध्ये स्वत:च्या PF खात्यात जमा असलेली रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येते. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना दोन्ही माध्यमांतून रिटायरमेंटनंतर उत्पन्न मिळू शकतं.

४. मृत्यूनंतर PF चे पैसे कोणाला मिळणार?

SWP चा लाभ घेताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर उरलेला पीफ नॉमिनी किंवा आश्रितांना पर्याय उपलब्ध असेल. ते उर्वरित रक्कम एकरकमी काढू शकतील किंवा नियमित पैसे मिळण्याचा पर्याय निवडू शकतील.

५. ही सुविधा कधीपासून सुरू होणार?

केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या २४० व्या बैठकीत SWP प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पण ही सुविधा प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी आवश्यक नियमांमध्ये बदल आणि अधिकृत अधिसूचना जारी होणं बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भरधाव कारचा मध्यरात्री भीषण अपघात, ३ जणांचा होरपळून मृत्यू

Sleep Problems : रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होताय? असू शकतात 'ही' ५ कारणे

Maharashtra News Live Update: निवतीच्या समुद्रात म्हातारी चूळ बघायला पर्यटकांची गर्दी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा धमाका! ६% इन्क्रिमेंटसह जुनी पेन्शनही मिळणार?

How To Keep Lizards Away: घरात पालींचा सुळसुळाट झालाय? खोली अशा पद्धतीने करा पेंट, आसपासही फिरकणार नाही पाल

SCROLL FOR NEXT