EPFO Marriage Advance Google
बिझनेस

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

EPF Marriage Withdrawal Rules: लग्नासाठी EPF मधून किती वेळा पैसे काढता येतात, किती रक्कम मिळते, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन Form-31 क्लेम प्रोसेस याबद्दल EPFO ने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याची महागाई इतकी वाढत चाललीये की, पैसे बचत करणं कठीण झालंय. त्यामुळे कर्मचारी थेट पगारातून पीएफमध्ये पैसे जमा करणं हा पर्याय सगळेच निवडतात. त्यात लग्नाच्या वेळेस तुम्हाला पैशांची गरज असते. अशावेळी तुम्ही तुमच्या पीएफचे पैसे काढू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(EPFO) ने ही एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिला आहे. स्वत:च्या किंवा कुटुंबातल्या सदस्याच्या लग्नासाठी EPF खात्यातली रक्कम अॅडव्हान्स स्वरुपात काढण्याची परवानगी EPFO च्या नियमांनुसार दिली जाते. नुकतच EPFO ने त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया पोस्टच्या मदतीने या सुविधेबद्दल पुन्हा एकदा माहिती दिली आहे.

EPFO च्या नियमांनुसार, पात्र सदस्यांना लग्नासाठी एकूण पाच वेळा पीएफ अॅडव्हान्स काढण्याची परवानगी असते. प्रत्येक वेळी पैसे काढताना EPFO ने केलेल्या अटी आणि पात्रता पूर्ण करणं गरजेचं असतं. ही सुविधा फक्त स्वत:च्या लग्नापुरती मर्यादित नसून मुलगा, मुलगी, भाऊ किंवा बहिण यांच्या लग्नासाठीसुद्धा वापरता येते.

रकमेबद्दल बोलायचं झालं तर, लग्नासाठी EPF खात्यात जमा असलेल्या पात्र शिल्लक रकमेपैकी ७५ टक्के रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येते. पण खात्यात २५ टक्के रक्कम शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात किती रक्कम मंजूर होईल, हे सदस्याच्या उपलब्ध पीएफ शिल्लक आणि EPFO च्या अधिकृत नियमांनुसार निश्चित केलं जातं.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सदस्यांनी EPFO Member e-Sewa पोर्टलवर UAN आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर Online Services वर क्लिक करा. त्यामध्ये क्लेम हा ऑप्शन निवडा. बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर PF Advance (Form-31) मध्ये Marriage हा ऑप्शन निवडा. तिथे तुम्हाला हवी ती रक्कम टाका. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP टाका आणि सबमिट करा.

या प्रक्रियेसाठी सक्रिय UAN, लग्नाचे निमंत्रण पत्र, आधार, पॅन, बँक KYC आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक असतो. त्यामुळे लग्नासाठी आर्थिक मदतीची गरज असल्यास EPFO ची ही सुविधा पात्र सदस्यांसाठी मोठा आधार ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT