epfo update news saam tv
बिझनेस

EPFO Latest Update : नोकरी सोडली तरी PF साठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही! आता फक्त 2 महिन्यांत मिळणार पैसे?

EPFO 8 Major Changes : EPFO ने PF खातेदांसाठी ८ महत्त्वाचे बदल मंजूर केले आहेत. आता ९० टक्क्यांपर्यंत पीएफचे पैसे काढता येणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

EPFO Rules Update: नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती तिच्या पगारातला काही भाग PF मध्ये जमा करत असते. त्याने भविष्यात अडचणींच्या वेळेस आर्थिक आधार मिळतो. आता PF खात्यातून पैसे काढणं, क्लेम सेटलमेंट आणि रिटायरमेंटनंतर बचतीचा वापर करणं यासंदर्भात महत्त्वाचे बदल समोर आलेत.

१९ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या EPFO च्या २४० व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना फायदेशीर निर्णय घेतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, EPFO मधली शिल्लक रक्कम ठेवण्याची अट २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. तसेच नोकरी सोडल्यावर पैसे काढण्यासाठी आता १२ महिने वाट न पाहता २ महिन्यापर्यंत पैसे काढू शकता. जाणून घेऊयात पुढे हे ८ महत्त्वाचे अपडेट्स.

EPFO चे ८ मोठे बदल, प्रत्येक PF खातेदाराने जाणून घ्या

१. PF मधली ९० टक्के रक्कम काढण्याचा मार्ग मोकळा?

आधी पीएफ खात्यातली २५ टक्के रक्कम किमान शिल्लक म्हणून ठेवणं आवश्यक होतं. आता ही अट १० टक्क्यांवर आणण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पात्र सदस्यांना उर्वरित ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची संधी मिळू शकते. पण लागू नियम आणि पात्रता महत्त्वाची असेल.

२. नोकरी सोडल्यानंतर फक्त २ महिन्यांत पीएफमधून पैसे काढता येणार

आधी अंतिम पीएफ सेटलमेंटसाठी १२ महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागत होती. आता तो कमी करून २ महिने करण्याची मंजुरी दिली आहे. बेरोजगार झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

३. मेडिकल, लग्न आणि शिक्षणासाठी पैसे काढण्याची सुविधा

आजारपणावरील उपचार, मुलांचं शिक्षण, लग्न तसेच घर खरेदी, बांधकाम आणि दुरुस्तीसाठी पात्रतेनुसार पीएफमधून अंशत: पैसे काढता येतात.

४. रिटायरमेंटनंतर हप्त्यांमध्ये मिळतील पीफचे पैसे

रिटायरमेंटनंतर संपूर्ण पीएफ रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) अंतर्गत ठरावीक कालावधीनंतर पैसे घेण्याचा पर्याय मंजूर करण्यात आला आहे. उरलेली रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहू शकतं.

५. तीन दिवसांत पीएफ क्लेम सेटमेंट

CITES प्रणालीच्या माध्यमातून पात्र सदस्यांचे ५ लाख रुपयांपर्यंतचे क्लेम तीन कामकाजाच्या दिवसांत ऑटो-सेटल होऊ शकतात.

६. शिक्षण आणि लग्नासाठी जास्त वेळा पैसे काढता येणार

नवीन नियमांनुसार शिक्षणासाठी १० वेळा आणि लग्नासाठी ५ वेळा अंदाजे पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

७. EPS-95 पेन्शनमध्ये वाढ झाली का?

सध्या किमान मासिक पेन्शन १००० रुपयेच आहे. १९ नोव्हेंबरच्या बैठकीत पेन्शन वाढीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पेन्शनधारकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

८. पीएफ क्लेम अडकू नये म्हणून हे काम करा!

तुमचे आधार, पॅन, बँक खातं, केवायसी, आणि UAN वरची सर्व माहिती अपडेट ठेवा. नोकरीचा तपशील आणि सर्व्हिस रेकॉर्डमध्ये चूक असेल तर ती वेळेत दुरुस्त करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujabal: मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात, ४ गाड्या एकमेकांना धडकल्या

Maharashtra News Live Update: अमरावतीत कोरडा दुष्काळ, तरीही जिल्हा परिषदेचा मंत्र्यांसाठी रेड कार्पेट

Washing Machine Cleaning Tips: वॉशिंग मशीन स्वच्छ कशी करायची? कपड्यांची दुर्गंधी आणि घाण घालवण्यासाठी पाहा 5 सोप्या टिप्स

Shocking : धक्कादायक! दारू प्यायल्यानंतर प्रकृती खालावली, १५ जणांचा तडफडून मृत्यू

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळांच्या पीएचं अखेर निलंबन, मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश दिल्यानंतर कारवाई

SCROLL FOR NEXT