EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO KYC Update: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आताच हे काम करा अन्यथा मिळणार नाही PFचे पैसे

PF Update: EPFO खातेदारांसाठी महत्वाची सूचना आहे. PF काढण्यासाठी KYC अपडेट अनिवार्य आहे. आधार, पॅन आणि बँक खाते व्हेरिफिकेशन नसेल तर तुमचा PF क्लेम अडकू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

नोकरदार वर्गासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुमच्या पगारतून दरमहिन्याला कापला जाणारा जमा PF काढण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करणं महत्वाचं आहे. कारण जर ती सोपी प्रोसेस तुम्ही टाळलीत तर तुम्हाला EPFO कडून तुमचा निधी काढता येणार नाही. तुमचा PF रखडू शकतो.

EPFOच्या खाते धारकांसाना ekyc करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ऐनवेळी त्यांना पीफचे पैसे काढता येत नाही. त्यासाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बॅंक खातं हे व्हेरिफाईट केलेलं असणं गरजेचं आहे.

तरच तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतील. तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याच्या गरज नाही. तसेच बॅंकेत जाऊन लांबच्या लांब रांगा लावण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या ५ ते १० मिनिटांत ही प्रोसेस पूर्ण करु शकता.

तुम्हाला EPFO KYC घरी अपडेट करायचे असेल तर सगळ्यात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा. मग मेंबर-इ-सेवा या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या. मग मॅनेज सेक्शनवर क्लिक करा. तुम्हाला KYCचा पर्याय दिसेल तो निवडा आणि तुमची माहिती भरा.

यात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. नंतर आधार कार्डाशी लिंक असणारा तुमचा मोबाईल नंबरवर मेसेज येतील. त्यात असणारा ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाल १ ते ६ दिवसात मंजुरीचा मेसेज येईल. या सोप्या स्टेप्सने तुम्ही घरबसल्या KYC करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT