Sakshi Sunil Jadhav
प्रत्येक शिव भक्ताला केदारनाथ जाण्याची इच्छा असते. अनेक भक्त केदारनाथचे दरवाजे कधी उघडणार याची वाट पाहत होते. अखेर तो दिवस आलाच.
केदारनाथ धाम हे २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
केदारनाथ मंदिर हे उंच डोंगरांमध्ये वसलेलं सगळ्यात सुंदर आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे.
दरवर्षी लाखो भाविक केदाननाथ मंदिर आणि शिव दर्शनासाठी खूप लांबचा प्रवास करुन येत असतात. पण प्रचंड थंडीमुळे काही काळ हे मंदिर बंद असतं.
केदारनाथ हे पंचकेदारांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. भक्तांसाठी श्रद्धेचं हे प्रमुख केंद्र आहे. इथे पोहोचल्यावर अनेकांच्या इच्छाही पूर्ण होतात असं मानलं जातं.
केदारनाथजवळचे शिवलिंग त्रिकोणी (बैलाच्या पाठीवरच्या उंच वशिंडासारखे) आकाराचे का आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. मुळात हे ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळं मानलं जातं.
केदारनाथच्या या शिवलिंगाच्या आकारामागे महाभारतातील एक विशेष कथा सांगितली जाते.
युद्धानंतर पांडवांना आपल्या कुटुंबाच्या हत्येचं प्रायश्चित्त घ्यायचं होतं. मग त्यांनी शिवाला शरण जायचे ठरवले. भगवान शिवांनी पांडवांची परीक्षा घेण्यासाठी नंदी बैलाचे रूप धारण करून स्वतःला लपवलं.
भीमाने बैलाची शेपटी पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा पाठीचा उंचवटा भाग केदारनाथ जवळच राहिला. त्यालाच त्रिकोणी शिवलिंग मानलं जातं. भगवान शिवाचे इतर अवयव वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले होते ते पंचकेदार म्हणून ओळखले जातात. यामुळे केदारनाथचे धार्मिक महत्त्व जास्त आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.