EPFO New Rule google
बिझनेस

EPFO New Rule : मोठा निर्णय! नोकरी बदलताच PF रक्कम होणार आपोआप ट्रान्सफर, अर्जाची गरज नाही

Automatic PF Transfer : EPFO च्या नवीन नियमानुसार आधारशी लिंक असलेल्या UAN च्या मदतीने नोकरी बदलताच पीएफ रक्कम आपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर होईल. त्यामुळे अर्जाची गरज नाही.

Sakshi Sunil Jadhav

खाजगी नोकरी करणारे लोक दोन ते तीन वर्षात नोकरी बदलत असतात. तेव्हा त्यांचा पीएफ नव्या कंपनीत ट्रासफर केला जातो. पण आता या नियमात EPFO ने मोठा बदल केला आहे. यानुसार आता ही प्रोसेस आणखी सोपी झालेली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO )ने खातेधारकांसाठी मोठा बदल केला आहे. आता नोकरी बदलल्यावर जुन्या PF खात्यातली रक्कम नवीन पीएफ खात्यात पाठवण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची गरज नाही. जर तुमचा १२ अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारशी लिंक असेल तर ही प्रोसेस पूर्णपणे स्वयंचलितपणे (Automated) पार पडणार आहे.

ईपीएफओने आपल्या सदस्यांचा डेटा केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित केला आहे. त्यामुळे PF संबंधीत बऱ्याच सेवा जास्त वेगवान आणि सोप्या झाल्या आहेत. याआधी नोकरी बदलल्यानंतर PF ट्रान्सफरसाठी कर्मचारी, जुनी कंपनी, नवीन कंपनी आणि ईपीएफओ यांच्याकडून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती.

अनेकदा यासाठी बराच वेळ लागत होता. पण नवीन डिजिटल प्रणालीमुळे कर्मचारी नवीन कंपनीत रुजू झाल्यावर लगेचच त्यांचं जुनं खातं आपोआप नवीन खात्याशी जोडलं जातं. UAN हा १२ अंकी क्रमांक असतो. हा नोकरीच्या शेवटापर्यंत त्याच UAN चा वापर केला जातो. त्यामुळे PF ची सर्व माहिती एकाच खात्याशी जोडलेली राहते.

एका व्यक्तीची बरीच पीएफ खाती असतील ती एकत्र करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे संपूर्ण सेवा इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध होतो, पीएफ शिल्लक एकत्र दिसतो आणि त्यावरचं व्याजही पूर्ण मिळतं. भविष्यात पीए काढणे, आगाऊ रक्कम घेणे किंवा पेन्शनशी संबंधीत प्रक्रिया सुद्धा सोपी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोबाईल नंबर बदलण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

SCROLL FOR NEXT