EPFO PF Interest 2024-25 Credited Saam Tv
बिझनेस

EPFO7: कोटी कामगारांसाठी मोठी खुशखबर! PF खात्यात जमा होणार व्याजाचा पैसा; वाचा बॅलन्स चेक करण्याची प्रक्रिया

PF Interest: EPFO कडून 7 कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यात 8.25% व्याज जमा झाले आहे. बॅलन्स तपासण्यासाठी मिस्ड कॉल, SMS, EPFO पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • EPFO ने 7 कोटी सदस्यांच्या खात्यात व्याज जमा केले आहे.

  • यंदा प्रक्रिया मागील वर्षाच्या तुलनेत अधिक वेगाने पूर्ण झाली.

  • 8.25% व्याजदरासाठी वित्त मंत्रालयाने मे 2024 मध्ये मंजुरी दिली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सुमारे 7 कोटी सदस्यांसाठी सरकारकडून मोठी खुशखबर समोर आली आहे. वर्ष 2024-25 साठीच्या पीएफ व्याज रकमेचे जमा काम पूर्ण झाले आहे. बहुतेक सदस्यांच्या खात्यांमध्ये पैसा पोहोचला आहे. वित्त मंत्रालयाकडून व्याजदरांची मंजुरी मिळाल्यानंतर फक्त दोन महिन्यांच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

99.9% संस्थांचे आणि 96.51% खात्यांचे अपडेट काम झाले आहे. उर्वरित खात्यांमध्येही या आठवड्यात व्याजाची रक्कम पाठवली जाणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही प्रक्रिया खूप वेगाने पार पडली होती. मागील वर्षी वित्त मंत्रालयाची मंजुरी आल्यानंतरही व्याज जमा करण्यासाठी खूप महिने वाट पाहावी लागत होती. त्या वर्षी प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होऊन डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती. मात्र यंदा EPFO ने सिस्टीममध्ये सुधारणा केल्याने संपूर्ण प्रक्रिया जास्त वेगाने पार पडली आहे.

वित्त वर्ष 2024-25 साठी 8.25% व्याजदर जाहीर केला होता. ही घोषणा 28 फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर 24 मे रोजी वित्त मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर सदस्यांच्या खात्यांमध्ये एकूण सुमारे 4,000 कोटी रुपये व्याजरूपाने जमा केले गेले आहेत.

बॅलन्स कसा तपासाल?

कामगारांना आपला पीएफ बॅलन्स विविध मार्गांनी तपासू शकतात. EPFO मध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास बॅलन्सची माहिती मिळते. त्याशिवाय EPFOHO UAN ENG असा मेसेज 7738299899 या नंबरवर पाठवूनही बॅलन्स तपासता येतो.

ऑनलाइन तपासण्यासाठी सदस्यांनी EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. passbook.epfindia.gov.in येथे लॉगिन करून UAN, पासवर्ड आणि कॅप्चा भरल्यानंतर पासबुक पाहता येतं. तसेच उमंग अॅपद्वारेही पीएफ बॅलन्स सहज तपासता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT