EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO चा मोठा निर्णय! आता चेहरा दाखवा अन् UAN नंबर जनरेट करा

EPFO Face Authetication For UAN Activation: ईपीएफओने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करुन यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करता येणार आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ईपीएफओने फेस ऑथेंटिकेशनद्वारे अनेक सर्व्हिसचा लाभ सुरु करणार आहे. यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी फेस ऑथेंटिकेशनद्वारे युनिव्हर्सल प्रोव्हिडंट फंड अकाउंट नंबर (UAN) जनरेट करु शकतात.

मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी फेस ऑथेंटिकेशनचा वापर करुन UAN नंबर जारी करायला आणि अॅक्टिव्हेशनसाठी अॅडव्हान्स डिजिटल सर्व्हिस सुरु करु शकतात. यामुळे कोट्यवधि कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्टलेस, सुरक्षित आणि डिजिटल सर्व्हिस देणार आहे.

आता कर्मचारी UMANG अॅपद्वारे आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे थेट यूएएन नंबर जनरेट करु शकणार आहे. नियोक्ता आपल्या नवीन कर्मचाऱ्यांसाठी फेस ऑथेंटिकेशनचा वापर करु शकतात. यामुळे कर्मचारी आणि नियोक्त्यांचा वेळ वाचणार आहे. आधार बेस्ड व्हेरिफिकेशननंतर यूएएन जनरेट केला जाणार आहे. यानंतर आधार लिंक असलेल्या नंबरवर पाठवला जाणार आहे.फेस ऑथेंटिकेशन करताना बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन, डेमोग्राफिक किंवा ओटीपी बेस्ड ऑथेंटिकेशन केले जाणार आहे.

लवकरच लाँच होणार EPFO 3.0 (EPFO 3.0 Launch Date)

ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. EPFO 3.0 मध्ये कर्मचाऱ्यांना पीएफ हा एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढता येणार आहे. तुम्ही थेट एटीएममध्ये जाऊन काही मिनिटांत पीएफचे पैसे काढू शकतात. यासाठी तुम्हाला ईपीएफओकडून कार्ड दिले जाईल. याचसोबत तुम्ही यूपीआयद्वारेही पीएफचे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT