कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बऱ्याचवेळा पीएफ खात्यात नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव किंवा नोकरीशी संबंधित माहिती चुकीची नोंदवली जाते. या छोट्या चुकीमुळे पीएफ क्लेम अडकणे, पैसे ट्रान्सफर होण्यात अडचणी येणं किंवा पेन्शनचा लाभ मिळायला उशीर होतो. पण आता अशा चुका तुम्ही घरच्याघरी दुरुस्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला EPFOच्या ऑफीसमध्ये फेऱ्या मारायची गरज नाही. EPFO च्या ऑनलाइन जॉइंट डिक्लेरेशन (Joint Declaration) या सुविधेमुळे ही माहिती सुधारती येते.
EPFO सदस्य पोर्टलच्या मदतीने वैयक्तिक आणि नोकरीशी संबंधित माहिती दुरुस्त करण्यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा.
सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत Member Portal वर जा. तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. लॉगिन केल्यावर मेन्यूमध्ये तुम्हाला Joint Declaration हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव, नोकरी सुरू केल्याची तारीख अशा ज्या तपशिलांमध्ये चूक आहे, ते निवडा.
मग आवश्यक बदल करून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशी मागितलेली कागदपत्रे अपलोड करा. शेवटी सर्व माहिती पुन्हा तपासून Submit करा. त्यानंतर अर्ज पुढील पडताळणी आणि प्रक्रियेसाठी पाठवला जाईल.
EPFO ने डिजिटल सुविधांचा वापर पुरेपुर केला आहे. तुम्ही WhatsApp मदतीनेही तुमच्या पीएफचे स्टेटस पाहू शकता. त्यासाठी अधिकृत फोननंबरवर Hi हा मेसेज करायचा आणि माहिती मिळवायची. या माध्यमातून खातेधारकांना PF बॅलन्स, अलीकडील पाच व्यवहार आणि पासबुकसंबंधित माहिती मिळवता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.