PF Interest Saam tv
बिझनेस

PF Interest : पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? शिल्लक तपासण्याची ऑनलाइन पद्धत जाणून घ्या

कोमल दामुद्रे

EPFO Amount : 24 जुलै रोजी, सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) ठेवींवरील व्याजदर 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस मंजूर केली होती.

या घोषणेनंतर, अनेक ईपीएफ सदस्य खात्यात व्याज जमा होण्याची वाट पाहत आहेत. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, पासबुकमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षासाठी व्याज कधी मिळणार आहे. त्यावर ईपीएफओने सांगितले की, लवकरच तुमच्या खात्यात व्याजदर जमा केला जाईल. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याचे नुकसान होणार नाही.

1. व्याजदर कसा मिळेल?

ईपीएफ (EPFO) खात्यातील व्याजाचे पैसे (Money) हे मासिक आधारावर केली जात असली तरी ते आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाते. त्यानंतर व्याज हे पुढील महिन्यातील शिल्लक रकमेमध्ये जोडले जाते. त्यानंतर त्या महिन्याच्या उर्वरित रकमेवरील व्याज दर मोजण्यासाठी वाढ केली जाते. खात्यात व्याज जमा झाल्यानंतर EPF सदस्य EPFO वेबसाइट, एसएमएस, मिस्ड कॉल किंवा उमंग अॅपद्वारे त्यांची शिल्लक तपासू शकतात.

2. या स्टेप्स फॉलो करु ईपीएफओचा व्याजदर चेक करा

  • EPFO च्या वेबासाइट्सद्वारे ईपीएफचे शिल्लक तपासाण्यासाठी सर्वात आधी epfindia.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर होमपेजवर जाऊन सर्व्हिसेसवर क्लिक करावे लागेल आणि For Employers च्या पर्यायावर जावे लागेल.

  • यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल. त्यात तुम्हाला सर्व्हिसेसच्या पर्यायावर सदस्य पासबुकवर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला एक लॉगिन पेज दिसेल. येथे तुम्हाला UAN, पासवर्ड (Password) आणि कॅप्चा टाकून तुमच्या खात्यात साइन इन करावे लागेल.

  • तुमच्या खात्यात साइन इन करावं लागले.

  • आता तुम्ही तुमच्या खात्यात असणारे पैसे व रक्कम पाहू शकता. याशिवाय तुम्ही एसएमएस, मिस्ड कॉल आणि उमंग अॅपद्वारे तुमची शिल्लक तपासू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

SCROLL FOR NEXT