PF Balance तपासण्यासाठी आता सायबर कॅफेत जाण्याची गरज नाही.
घरबसल्या PF खात्यातील शिल्लक व योगदान तपासू शकतो
मिस्ड कॉल, SMS, UMANG App आणि EPFO Portalच्या मदतीने पहा बॅलेंस
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF ही महत्त्वाची बचत असते. मात्र, अनेकदा PF खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, व्याज किती मिळाले किंवा शेवटचे योगदान किती आहे, हे तपासण्यासाठी सायबर कॅफे किंवा ऑनलाइन सेंटरची मदत घ्यावी लागते. यासाठी १०० ते २०० रुपये खर्च करण्याचीही वेळ येते. मात्र, आता ही माहिती मिळवण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. कर्मचारी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून मोफत PF Balance तपासू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने PF खात्याची माहिती मिळवण्यासाठी विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इंटरनेट नसतानाही काही पर्यायांच्या मदतीने PF खात्यातील शिल्लक तपासता येते.
PF Balance तपासण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे मिस्ड कॉल सेवा. यासाठी UAN क्रमांकाशी लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागतो. काही वेळात कॉल आपोआप कट होतो आणि त्यानंतर EPFO कडून SMS येतो. या SMS मध्ये खातेदाराचे नाव, जन्मतारीख, शेवटचे योगदान आणि PF खात्यातील उपलब्ध पैसे यासंबंधी माहिती मिळते.
इंटरनेट उपलब्ध नसल्यास SMS द्वारेही PF Balance तपासता येतो. यासाठी नोंदणीकृत मोबाईलवरून 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG असा SMS पाठवावा. मराठी भाषेत माहिती हवी असल्यास ENG ऐवजी MAR वापरता येते.
कर्मचारी UMANG ॲपच्या माध्यमातूनही PF खात्याचा तपशील पाहू शकतात. ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर ‘View Passbook’ हा पर्याय निवडून योगदान आणि खात्याचा संपूर्ण तपशील पाहता येतो. तसेच EPFO च्या अधिकृत Member Passbook Portal वरूनही ही माहिती मिळवता येते. या सुविधांचा वापर करण्यासाठी UAN सक्रिय असणे आणि मोबाईल क्रमांक EPFO खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच KYC संबंधित माहिती अपडेट असणे फायदेशीर ठरते. PF संदर्भातील फसवणूक टाळण्यासाठी OTP, पासवर्ड, बँक तपशील किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.