Anil Ambani ED lookout notice saam tv
बिझनेस

ED Raids : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

ED raids and arrests in Reliance Power money laundering case : ईडीने रिलायन्स पॉवरचे सीएफओ अशोक कुमार पाल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. बनावट बँक हमी आणि कागदपत्रांच्या माध्यमातून ६८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप.

Namdeo Kumbhar

Anil Ambani group money laundering investigation details : सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate किंवा ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रिलायन्स पॉवरचे अधिकारी असोक कुमार पाल यांना ईडीने अटक केली आहे. अशोक कुमार पाल यांना अनिल अंबानी यांचा विश्वासू म्हणून ओळखलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, पाल याची दिल्लीमधील केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. रिलायन्स पॉवर संदर्भातील बनावट बँक हमी आणि बनावट कागदपत्राच्या प्रकरणात पॉलची कसून चौकशी झाली. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

नेमका आरोप काय आहे ? Why did ED arrest Reliance Power CFO Ashok Kumar Pal?

अशोक कुमार पाल हे रिलायन्स पॉवर लिमिटेडमध्ये सीएफओ (कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. ईडीकडून अशोक पाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सोलर एनर्जी कॉरपोरेशन ऑफ इंडिया (SECI) ला ६८ कोटींपेक्षा अधिक बनावट बँक हमीची कागदपत्रे जमा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केलाय. बनावट चलानच्या माध्यामातून पैशांची फेरफार करण्यात आली. त्याशिवाय एसबीआय, इंडियन बँक, पीएनबी आणि यूनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकेचे नाव घेऊन घोटाळा करण्यात आला. त्याशिवाय बनावट ईमेल डोमेन वापरून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आढळलेय.

ईडीच्या आरोपानुसार, अशोक पाल याने अनिल अंबानींच्या एका सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट हमी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय बिस्वाल ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची करारासाठी निवड करण्यात आली. या कंपनीकडे कोणताही ट्रॅक नव्हता. तरीही त्या कंपनीची निवड करण्यात आली. बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर करण्याचं हे रॅकेट असल्याचे तपासात समोर आलेय. सरकारी प्रकल्पातील निधी खासगी फायद्यासाठी वळवण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासातून समोर आलेय. ईडीच्या मते, बीटीपीएलचे संचालक पार्थ सारथी बिस्वाल आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत.

१७,००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण काय ?

तब्बल १७,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडीकडून अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने ऑगस्टमध्ये अंबानींना चौकशीसाठी बोलावले होते. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत मुंबईतील ३५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये ५० कंपन्या आणि २५ व्यक्तींची नावे समोर आली होती. येस बँक आणि एडीए समूह कंपन्यांशी संबंधित हे प्रकरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT