E10 PETROL IN INDIA? 8 CRORE VEHICLES COULD GET RELIEF FROM E20 saam tv
बिझनेस

देशात आता E-10 पेट्रोल मिळणार? 8 कोटी गाड्यांची E-20पासून सुटका?

E-20 Petrol Row: E-20 पेट्रोलमुळे वाहनं खराब होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येताहेत. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी थेट गंभीर इशारा दिलाय..त्यामुळे केंद्र सरकारही खडबडून जागं झाल्याची चर्चा आहे. आर्थिक सल्लागारांनी नेमकं काय म्हटलंय?.पाहूयात यावरचा एक रिपोर्ट.

Suprim Maskar

  • E-10 पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करण्याबाबत चर्चा सुरू

  • सुमारे 8 कोटी वाहनांना E-20 ऐवजी E-10चा पर्याय मिळू शकतो का?

  • E-10 पेट्रोल देशभर पुन्हा लागू करण्याबाबत अंतिम सरकारी निर्णय

नीटनंतर देशात सर्वाधिक चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथेनॉलचा. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय़ घेतल्यामुळे जुन्या वाहनधारकांनी याला जोरदार विरोध केला. अनेकांनी वाहनं खराब होत असल्याच्या तक्रारी केल्या. आता याची दखल थेट मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनीही घेतलीय. त्य़ांनी यावर महत्त्वाचा तोडगा सूचवलाय. काय म्हटले आहेत नागेश्वरन ते पाहूयात.

देशात सुमारे 8 कोटींपेक्षा जास्त जुनी वाहनं आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देताना निदान जुन्या वाहनांसाठी तरी ‘E-10’ पेट्रोलचा पर्याय परत खुला करावा. भविष्यात E27 किंवा E30 कडे जाताना पिकांच्या पद्धती आणि पाणी-जमिनीच्या नियोजनावर विपरीत परिणाम होईल. इथेनॉलची मागणी वाढल्यास मका आणि उसासारख्या पिकांचा वापर अन्नाऐवजी इंधनासाठी होईल, ज्यामुळे खाद्यान्नाचे भाव वाढू शकतात. विशेष म्हणजे, मका हा पोल्ट्री आणि पशुखाद्याचा मुख्य भाग असल्याने, त्याच्या किंमती वाढल्यास सर्वसामान्य जनतेवर महागाईचा भार वाढेल.

त्यांनी सूचवलेल्या या महत्त्वाच्या तोडग्यावर E-10 पेट्रोल आणि डिझेल पुन्हा उपलब्ध करण्याबाबत केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झालीय. खरंतर, एप्रिल 2023 पासून देशात तयार होणारी पेट्रोल वाहने E-20 इंधनासाठी तयार करण्यात आली आहेत. मात्र, जुन्या कोट्यवधी वाहनांची समस्या वाढलीय. त्यामुळे आता सरकार आणि तेल कंपन्यांतील चर्चेतून यासंदर्भात काय तोडगा निघणार?... देशातील 8 कोटी वाहनधारकांना सरकार दिलासा देणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी अटकेत; राजापेठ पोलिसांची कारवाई

Heart blockage symptoms: ही 5 लक्षणं दिसली तर समजा की हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात; हार्ट अटॅक येण्यापूर्वी लक्ष द्या

Mumbai Tourism : किल्ल्यासारखं दिसणारं गणपतीचं मंदिर, मुंबईजवळच आहे 'हे' खास लोकेशन

EPFO New Rule 2026 : मोठी बातमी! ₹25,000 EPFO मर्यादा लागू; तुमचा पगार कमी होणार?

Cardamom Benefits: पचनक्रिया सुधारण्यापासून तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापर्यंत; रोज १ वेलची खाण्याचे ७ फायदे

SCROLL FOR NEXT