New driving licence rules in India 2026 saam tv
बिझनेस

ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलला! पास होण्यासाठी ६० नव्हे तर ७५% गुण पाडावेच लागणार, केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

New Driving Licence Rules In India 2026: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठे बदल प्रस्तावित आहेत. ऑनलाइन परीक्षेत 75 टक्के गुण, भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी वेगवेगळे रंग तसेच रक्तगट, मोबाईल नंबर आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती देण्याच्या प्रस्तावाबद्दल जाणून घ्या.

Omkar Sonawane

केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. या प्रस्तावानुसार, भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी वेगवेगळ्या रंगांचे ड्रायव्हिंग लायसन्स करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ऑनलाइन परीक्षेत उतीर्ण होण्याचे निकषही अधिक कठोर केले जाऊ शकतात. मात्र हे सर्व बदल सध्या प्रस्तावित असून, त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी अंतिम नियम जाहीर होणे बाकी आहे.

भारतीय आणि परदेशी नागरिकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा रंग वेगळा असणार?

केंद्रीय मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, ड्रायव्हिंग लायसन्सवर परवानाधारकाच्या राष्ट्रीयत्वाचा उल्लेख केला जाऊ शकतो. यासाठी भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांना वेगवेगळ्या रंगांचे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बदलामुळे लायसन्स पाहून संबंधित व्यक्तीचे राष्ट्रीयत्व ओळखणे सोपे होऊ शकते.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 75 टक्के गुण आवश्यक?

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या नियमांमध्येही बदल करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या मूल्यांकनात उतीर्ण होण्यासाठी 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. मात्र प्रस्तावित बदलानुसार ही मर्यादा वाढवून 75 टक्के केली जाऊ शकते. या बदलाचा उद्देश वाहनचालकांना सुरक्षित ड्रायव्हिंग नियमांची अधिक चांगली माहिती आहे की नाही, याची तपसणी करणे हा आहे.

मोबाईल नंबर आणि रक्तगटाची माहिती देणे बंधनकारक होणार?

प्रस्तावित नियमांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना रक्तगट, मोबाईल नंबर आणि आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Maharashtra News Live Update: पुणे पदवीधर मतदारसंघात ४०.६० टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदान

Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

Menopause Symptoms: महिलांच्या शरीरात वयाच्या ३० वर्षांनंतर होतात हे मोठे बदल; काय आहे कारण मेनोपॉज की दुसरं काही?

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT