DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता येण्यास उशिर का? कितीने वाढणार पगार? वाचा सविस्तर

DA Hike Announcement: महागाई भत्ता येण्यास उशिर झाला आहे. एप्रिल महिना उजाडला तरी अजून घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Siddhi Hande

महागाई भत्ता येण्यास उशिर

एप्रिल उजाडला तरी महागाई भत्त्याची घोषणा नाही

महागाई भत्ता उशिरा येण्याचे कारण काय?

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक जानेवारीच्या महागाई भत्त्याची वाट पाहत आहे. एप्रिल महिना सुरु झाला तरी अजून जानेवारीच्या महागाई भत्त्याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आठवा वेतन आयोग अजून लागू न झाल्याने हा सातव्या वेतन आयोगाअंतर्गत दिला जाणारा महागाई भत्ता आहे.

महागाई भत्ता वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होते. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होतो. दरम्यान, अजूनही याबाबत कोणतीही अपडेट न आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. जानेवारी आणि जून महिन्यात वाढ केली जाते. जानेवारीच्या महागाई भत्त्याची घोषणा मार्चमध्ये केली जाते तर त्यानंतर जुलैमध्ये महागाई भत्ता लागू होतो. याची घोषणा सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये होते.

महागाई भत्ता येण्यास उशिर का?

मार्च महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा होण्याची अपेक्षा होती. परंतु असं न झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. नेहमीच्या मंजुरींशिाय व्यापक आर्थिक परिस्थितीदेखील महागाई भत्त्यासाठी महत्त्वाची ठरते. सरकार खूप लवकर महागाई भत्त्याची घोषणा करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने करण्यास प्राधान्य देईल, असं तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे कदाचित सरकार महागाई भत्त्याबाबत हळूहळू निर्णय घेईल.

महागाई भत्ता किती वाढेल?

महागाई भत्ता हा मागच्या महिन्याच्या (AICPI-IW) वर अवलंबून असतो. महागाईनुसार महागाई भत्त्यात किती वाढ करायची हे ठरवले जाते. वर्षभराच्या सरासरीवरुन हा महागाई भत्ता ठरवला जातो. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढू शकतो. त्यामुळे महागाई भत्ता ५८ वरुन ६० टक्के होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT