DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

DA Hike Notification Issued: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत ३८ टक्के केली आहे. हा निर्णय १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक अजूनही जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीची वाट पाहत आहेत. दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने आपल्या राज्यातल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवून ३८ टक्के करण्याची अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. हा वाढीव दर १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे. दुर्गापूजेच्या आधी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

राज्याच्या वित्त विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित बेसिक सॅलरीवर आता ३८ टक्के महागाई भत्ता मिळेल. तसेच पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना सुधारित पेन्शनवर त्याच दराने महागाई सवलत सुद्धा दिली जाणार आहे.

तसेच पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १७१ टक्क्यांवरून २२३ टक्के करण्यात आला आहे. ज्या पेन्शनधारकांची पेन्शन अजून ROPA-२००९ वरून ठरलेली नाही, त्यांना सुद्धा सुधारित पेन्शन लागू होईपर्यंत २२३ टक्क्यांनी महागाई भत्ता सवलत मिळणार आहे.

सरकारने स्पष्ट केलं की, महागाई भत्त्याचे गणित सुधारित मूळ वेतन आणि लागू असल्यावर नॉन- प्रॅक्टिसिंग अलाउन्स (NPA) यांच्या आधारे केली जाईल. इतर कोणतेही भत्ते या गणनेत समावेश केले जाणार नाहीत.

या निर्णयाचा लाभ राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, सरकारी अनुदानित शाळा महाविद्यालयातले शिक्षकेतर कर्मचारी, वैधानिक संस्था, सरकारी उपक्रम, पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कामगारांना मिळणार आहे. तर बेसिक सॅलरी कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या दैनिक वेतनभोगी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या मजुरीत ११० रुपयांची तात्पुरती वाझ करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. ही वाढही १ ऑक्टोबरपासून लागू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT