सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी
महागाई भत्ता या दिवशी वाढण्याची शक्यता
कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत. आता कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. जानेवारी २०२६ पासूनचा महागाई भत्ता वाढणार आहे.होळीआधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करु शकतो.
केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करणार आहे. महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढू शकतो. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यापूर्वी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. होळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढू शकतो. दरम्यान, हा महागाई भत्ता डिसेंबरच्या AICPI-IW डेटाच्या आधारे ठरवला जातो.
२०२६ मधील पहिला महागाई भत्ता
२०२६ मधील पहिला महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जानेवारीपासून जरी आठवा वेतन आयोग लागू केला असेल तर शिफारसी लागू झाल्या नाहीत. शिफारसी लागू होईपर्यंत सातव्या वेतन आयोगावर आधारित महागाई भत्ता ठरवला जाणार आहे. याचा फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
महागाई भत्ता म्हणजे काय? (What is Dearness Allowance)
वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो. वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात येतो. हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर ठरवला जातो. त्यामुळे महागाई भत्ता वाढवल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढतो.
आतापर्यंत महागाई भत्ता कितीने वाढला?
जून २०२५ मध्ये AICPI-IW डेटानुसार सरकारने महागाई भत्ता वाढवला होता. हा महागाई भत्ता प्रत्यक्षात ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना मिळाला. हा भत्ता ३ टक्क्यांनी वाढला होता. त्यावेळी महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के पर्यंत वाढला आहे. यानंतर यावेळी महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.