DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलमध्ये वाढू शकतो महागाई भत्ता, नवीन अपडेट समोर

Central Government Employees DA Hike 2026 in April: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एप्रिल महन्यात महागाई भत्त्यात वाढ केली जाऊ शकते.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

महागाई भत्ता एप्रिलमध्ये वाढू शकतो

सरकारी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा महागाई भत्ता एकत्र मिळणार

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्याची वाट पाहत आहेत. दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जून महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात येतो. दरम्यान, जानेवारी २०२६ च्या महागाई भत्त्याची सरकारी कर्मचारी वाट पाहत आहेत. दरम्यान, अजूनही याबाबत घोषणा आलेली नाही.

केंद्र सरकार आता कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर देऊ शकतो. एप्रिल २०२६ मध्ये महागाई भत्त्याची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, महागाई भत्ता कितीने वाढणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. महागाई भत्ता हा CPI-IW म्हणजे कंज्यूमर प्राइस इंडेक्सनुसार ठरवला जातो.

महागाई भत्ता लागू होण्यास उशिर का?

जानेवारी २०२६ चा महागाई भत्ता सातव्या आणि आठव्या वेतन आयोगामधील मानला जातो. ७व्या वेतन आयोगाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपला आहे. त्यानंतर आता नवीन वेतन आयोग लागू झाला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी अजून वेळ आहे. तोपर्यंत सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढवला जाईल.

कोणाला मिळणार फायदा?

महागाई भत्त्याचा १ कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होतो. कर्मचाऱ्यांना DA आणि पेन्शनधारकांना DR मध्ये वाढ मिळते. वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढतो. आता कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा महागाई भत्ता एकत्र मिळू शकतो. जर एप्रिलमध्ये महागाई भत्ता वाढला तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा महागाई भत्ता एकत्र येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT