Credit Card Rule Saam Tv
बिझनेस

Credit Card Rule: क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Reward Points मध्ये होणार बदल

Credit Card Rule Changes: क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. क्रेडिट कार्ड युजर्सच्या नियमांमध्ये १ सप्टेंबरपासून बदल होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Siddhi Hande

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank)क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या रिवॉर्ड पॉइंट्सच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या नवीन नियमांनुसार तुम्ही एका महिन्याला फक्त २००० रुपयांचे क्रेडिट पॉइंट मिळू शकतात.

काही ठरावीक रिवॉर्ड्स पॉइंट (HDFC Reward Points) खर्च करण्याच्या उद्देशाने नवीन नियम लागू करण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून तु्म्हाला फक्त दरमहिन्याला २००० पॉइंट्स देण्यात येणार आहे. या व्यव्हारांनुळे Merchant Category Codes ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा चांगला वापर करता येणार आहे.

एचडीएफसी बँक आता कोणत्याही इतर अॅप युजर्संना रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाहीत. फक्त एचडीएफसी बँकेच्या अॅपवरुन व्यव्हार करणाऱ्या ग्राहकांनाच रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहे. यामुळे बँकेच्या अॅपवरुन व्यव्हार करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

एचडीएफसी बँकेसोबतच आयडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. IDFC बँक क्रेडिट कार्डवरील किमान देय रक्कम कमी करणार आहे. यामुळे ग्राहकांना पेमेंट करण्याचा कालावधीदेखील कमी होऊ शकतो. ग्राहकांना १८-१५ दिवसांच्या आता पेमेंट करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT