यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन अनेकांना सरकारी अधिकारी व्हायचे असते. परंतु खूप कमी विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. परंतु अनेकजण खूप मेहनतीने पहिल्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करतात. असंच काहीस सक्षम गोयल यांच्यासोबत झालं. सक्षम गोयल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)
सक्षम यांनी २१ व्या वर्षी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहे. कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे खूप कठीण असते. परंतु सक्षम यांनी सेल्फ स्टडी करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.
सक्षम गोयल हे मूळचे आग्र्याचे रहिवासी आहेत. त्यांना बालपण आग्र्यातच गेले. त्यांनी १० वीपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. त्यानंतर २०१५ मध्ये ते दिल्लीला गेले. दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यांनी १२वीची परीक्षा क्रॅक केली.
यानंतर त्यांनी इकोनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. याच काळात त्यांना हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली होती. ही इंटर्नशिप ३ महिन्यांची होती. परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कॉलेजच्या काळातच यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी ऑनलाइन अभ्यास केला. सेल्फ स्टडी करुन त्यांनी परीक्षा क्रॅक केली. (Success Story Of IAS Saksham Goyal)
सक्षम गोयल यांनी २०२१ मध्ये ऑल इंडिया रँकमध्ये २७ वी रँक मिळवली होती. ते सध्या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सक्षम यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करुन अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी खूप कमी वयात हे यश मिळवलं आहे.त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देईन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.