EPF Money Claim Saam Tv
बिझनेस

EPF Money Claim: कंपनी बदलली, अन् PF खात्यात अडकले पैसे, घरबसल्या असे मिळवा परत; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Employees provident Fund News: कंपनी बदलली, अन् PF खात्यात अडकले पैसे, घरबसल्या असे मिळवा परत; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

साम टिव्ही ब्युरो

EPF Money Claim: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees provident Fund) हे एक अतिशय महत्त्वाचे आर्थिक उत्पादन आहे, जे तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात खूप मदत करते. पण अनेकदा नोकरी बदलल्यानंतर लोकांना पीएफच्या पैशांबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसे मागील कंपनीच्या पीएफ खात्यात अडकलेले पैसे नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात कसे हस्तांतरित करायचे? (Utility News in Marathi )

कोणत्या येतात अडचणी?

जर तुम्ही नोकरी बदलून नवीन कंपनीत जॉईन केलं असेल आणि तुम्ही नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकत नसाल किंवा 36 महिन्यांपर्यंत पीएफ खात्यात कोणताही व्यवहार झाला नसेल, तर तुमचे पीएफ खाते आपोआप बंद होईल. हे निष्क्रिय खाते म्हणून मानले जाईल.

असं झाल्यास तुम्हाला तुमचे पैसे काढण्यात खूप अडचणी येतील. बँक तुम्हाला मदत करू शकते आणि तुम्ही केवायसीद्वारे पीएफचे पैसे काढू शकता. पण आता निष्क्रिय खात्यावरही व्याज मिळते. (Latest Marathi News)

सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त

  • बँकेतून क्लिअरिंग केल्यानंतर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी खात्यांमधून पैसे काढण्यास किंवा खात्यातून हस्तांतरणास मान्यता देतील.

  • जर ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या मान्यतेनंतर पैसे काढले किंवा हस्तांतरित केले जातील.

  • जर रक्कम 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 50 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर खाते अधिकारी निधी हस्तांतरण किंवा काढण्यास मान्यता देतील.

  • जर रक्कम 25,000 पेक्षा कमी असेल तर डीलिंग असिस्टंट ते मंजूर करू शकतो

कोणते आहेत आवश्यक कागदपत्रे

जर तुमची जुनी कंपनी बंद असेल आणि दावा प्रमाणित करण्यासाठी कोणीही नसेल, तर असे दावे केवायसी कागदपत्रांच्या आधारे बँकेद्वारे प्रमाणित केले जातील. केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ईएसआय ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT