LPG Price Hike  Saam TV
बिझनेस

LPG Price Hike : LPG गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ; ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना जोरदार झटका

LPG Gas Cylinder Rate Increased : सरकारी तेल कंपन्या म्हणजेच OMCs यांनी दिलेल्या महितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या दरांत बदल झाला आहे. सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण आहे. कारण १ तारखेपासून विविध वस्तूंच्या दरांत बदल झाला असून गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्या म्हणजेच OMCs यांनी दिलेल्या महितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या दरांत बदल झाला आहे. सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

LPG गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेला बदल व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. त्यामुळे 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 6.5 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. बदल झालेले हे नवे दर आजपासूनच सुरू होत आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी जास्त वापरला जातो. त्यामुळे येथील जेवणाच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी 19 किलोग्रॅमचे सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाले होते याच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. किंमती कमी केल्यानंतर आता पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये घरगुती वापरात असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

सिलिंडरच्या किंमती

वाढलेल्या दरांनुसार मेट्रो शहरांमध्ये किंमती पुढील प्रमाणे आहेत.

दिल्लीमध्ये 1652.50 रुपये

कोलकातामध्ये 1764.50 रुपये

मुंबईत 1605 रुपये

चेन्नईमध्ये 1817 रुपये

खाद्य पदार्थ महागणार

बाहेरील रेस्टॉरंटमधील चमचमीत आणि चविष्ट पदार्थ चाखणे प्रत्येक व्यक्तीला आवडतं. तुम्ही सुद्धा महिन्यातून एकदा किंवा काही सेलिब्रेशवेळी बाहेरील जेवणावर ताव मारत असाल. आता गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत असल्याने पदार्थांच्या किंमती सुद्धा वाढू शकतात अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

bridge collapse : मोठा अनर्थ टळला! डंपरच्या भारानं जुना पूल कोसळला, सुधागडमधील दुर्घटना

पुण्यानंतर मुंबईत खळबळ; CSMT, BMC वर संशयास्पद ड्रोन; नागरिक भयभीत

PM मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांचा ठेंगा; मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कधी कमी होणार?

हृदयद्रावक! मामाच्या गावी आलेल्या ३ शाळकरी मुलींचा धरणात बुडून मृत्यू; गावावर दुःखाचा डोंगर

Pune Bomb: मोठी बातमी! पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली, ७ तासांचा टाईम सेट; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT