CNG Price in Mumbai and Delhi Saam Tv
बिझनेस

CNG Price Hike: दिल्लीकरांना मोठा झटका, सीएनजी दरात वाढ; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

CNG Price in Mumbai and Delhi: आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या दिल्लीकरांना आणखी एक झटका बसला आहे. गुरुवारी सकाळी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

Satish Daud

CNG Price in Mumbai and Delhi

आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या दिल्लीकरांना आणखी एक झटका बसला आहे. गुरुवारी सकाळी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवड्यात दुसऱ्यांदा सीएनजीच्या किंमती वाढल्या असून तेल कंपन्यांनी आजपासून नवे दर जारी केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली-एनसीआरपाठोपाठ गाझियाबादमध्ये सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही शहरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा नवीन दर ७६.५९ रुपये प्रति किलो इतका झाला आहे, तर नोएडा आणि गाझियाबाद शहरात सीएनजीचा दर ८२.२० प्रति किलोवर पोहचला आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने प्रवास देखील वाढण्याची शक्यता आहे.

याआधी 23 नोव्हेंबरलाही दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलो १ रुपयाची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, दिल्लीकरांना दिलासा देण्यासाठी सरकारने जुलै महिन्यात सीएनजीच्या किंमती ठरवण्यासाठीच्या मानकांमध्ये बदल केला होता. मात्र, याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचं दिसून येतंय.

मुंबई-पुण्यात सीएनजीचा भाव काय?

एकीकडे दिल्लीत सीएनजी महागला असला, तरी मुंबई आणि पुण्यात सीएनजीच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो ७६ रुपये इतका असून पुण्यात प्रतिकिलो ८८ रुपयांवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT