LPG users new government plan for piped natural gas connection saam tv
बिझनेस

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन? बदलू शकतात गॅस कनेक्शनचे नियम

LPG connection: तुमच्याकडे LPG कनेक्शन आहे का? केंद्र सरकार पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा वाढवण्याच्या तयारीत आहे. PNG कनेक्शन, LPG ग्राहकांवर होणारा संभाव्य परिणाम आणि सरकारचा नवा प्लॅन जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारचा एलपीजी कनेक्शनबाबत नवा प्लॅन काय आहे

  • एलपीजी कनेक्शन बंद होणार का पाइप्ड गॅसचा पर्याय काय

  • घरगुती स्वयंपाकासाठी पाइपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा योजना

वाचक मित्रांनो, जर तुमच्याकडे एलपीजी कनेक्शन असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारनं आता पाईपद्वारे प्राकृतिक गॅस पुरवण्याची योजना आखलीय. या योजनेंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितलंय. ज्या भागांत पाईपलाईनची सुविधा उपलब्ध आहे, तिथे घरांना पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस (पाईप्ड कुकिंग गॅस) पुरवठा जोडणी मिळवून देण्यासाठी हे अधिकारी गॅस वितरण आणि पेट्रोलियम विपणन कंपन्यांशी समन्वय साधतील.

एलपीजी असेल तर पीएनजी मिळणार नाही

ज्या भागांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहेत, तिथे LPG आणि PNG अशी दोन्ही कनेक्शन्स एकाच वेळी बाळगण्यावर बंदी घालण्यात येईल. नवीन नियमांनुसार, नोटीस मिळूनही PNG कनेक्शनसाठी अर्ज न करणाऱ्या ग्राहकांचा LPG पुरवठा खंडित केला जाऊ शकतो.

पीएनजीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एलपीजी (LPG) नियंत्रण आदेश 'आवश्यक वस्तू कायदा, १९५५' च्या कलम ३ अन्वये जारी करण्यात आला आहे. यासाठी परिसरातील पीएनजी समन्वय समिती गठीत केली जाईल. समिती निवासी सोसायटी आणि पात्र असलेल्या घरांची पडताळी करतील. त्यांना सूचना देतील.

यासह ग्राहकांसाठी जनजागृती आणि जोडणी शिबिरे आयोजित केली जातील. सरकारचा असा विश्वास आहे की, पीएनजी (PNG) च्या विस्तारामुळे स्वयंपाकासाठी एलपीजीवरील (LPG) अवलंबित्व कमी होईल. आंतरराष्ट्रीय संकटे तसेच सागरी वाहतुकीतील व्यत्ययांचा सामना करण्यासाठी भारताचा ऊर्जा पुरवठा अधिक सक्षम व लवचिक बनेल.

LPG पुरवठ्यावर झाला होता परिणाम

या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम आशियातील संकटकाळात एलपीजीच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारत आपल्या देशांतर्गत एलपीजीच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयात करतो आणि पश्चिम आशियातून होणारा पुरवठा सागरी मार्गांवर अवलंबून असतो. त्या संकटकाळात देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देणे भाग पडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

SCROLL FOR NEXT