Aadhaar-PAN Cancel Saam Tv
बिझनेस

Aadhaar-PAN Cancel: मृत व्यक्तीचे पॅन-आधार कार्ड रद्द कसं करायचं? आजच करा हे काम, अन्यथा होईल मोठं नुकसान

Aadhaar-PAN Card Cancel Process: मृत व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड रद्द करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा दुरुपयोग होऊ शकतो.

Siddhi Hande

प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड नसेल तर अनेक महत्त्वाची कामे करताना अडथळे येतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डबाबत काय करावे. अनेकजण ते आधार कार्ड आणि पॅन कार्ड असंच ठेवून जातात.

एक्सपर्टच्या मते, तुम्ह एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड कॅन्स करावे. कारण या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो. कोणीही या कागदपत्रांचा वापर करुन फसवणूक, सायबर फ्रॉड करु शकतो. याचसोबत हे अकाउंट जर बँक अकाउंटशी लिंक असेल तर तुमचे आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मृत व्यक्तीचे पॅन आणि आधार कार्ड रद्द करु शकतात, त्याची प्रोसेस जाणून ध्या.

मृत व्यक्तीचे पॅन कार्ड कसे कॅन्सल करावे?

कोणतेही पॅन कार्ड हे त्याच्या एक्सपायरी डेटपर्यंत वॅलिड असते. जर कोणत्याही व्यक्तीचे अचानक निधन झाले तर तुम्हाला ते पॅन कार्ड रद्द करावे लागेल. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या पॅन कार्डची चुकीच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पॅन कार्ड रद्द करु शकतात.

पॅन कार्ड कॅन्सल करण्याची ऑफलाइन पद्धत

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला मृत व्यक्तीचे नाव, तारीख आणि पॅन कार्ड रद्द करण्याचे तारीख लिहायची आहे. याचसोबत डेथ सर्टिफिकेट द्यायचे आहे. हे तु्म्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या एओकडे जमा करावे लागेल. याचसोबत तुम्ही टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन एओबाबत सर्व माहिती मिळवू शकतात.

तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने हे काम करण्यासाठी Form 49A भरावा लागले. हा फॉर्म तुम्हाला NSDL च्या वेबसाइटवर मिळेल. यावर तुम्हाला करेक्शन अॅप्लिकेशन आणि पॅन कार्ड कॅन्सलची रिक्वेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर जवळच्या NSDL PAN सर्विस सेंटरमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करावी लागेल.

आधार कार्ड

तुमच्याकडे आधार कार्ड कॅन्सल करण्याचे कोणताही ऑप्शन नाही आहे. परंतु तुम्ही त्यांचा डेटा लॉक करु शकतात. तुम्ही एक एसएमएस करुन डेटा लॉक करु शकतात. यासाठी तुम्हाला 1947 या नंबरवर मेसेज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT