LPG connection rules meta ai
बिझनेस

LPG Connection Rule : एकाच घरात दोन गॅस कनेक्शन मिळतात का? जाणून घ्या काय आहे नियम

LPG Gas Rules : एकाच घरात घरमालक आणि भाडेकरू स्वतंत्र LPG कनेक्शन घेऊ शकतात का? पात्रता, रेशन कार्ड आणि केवायसीबाबत काही नियम जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

एकाच घरामध्ये घरमालक आणि भाडेकरू अशी दोन वेगवेगळी कुटुंबं राहत असतील, तर स्वयंपाकासाठी स्वतंत्र गॅस कनेक्शनची गरज भासू शकते. मात्र, एकाच पत्त्यावर दोन LPG कनेक्शन घेता येतात का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत काही अटी पूर्ण केल्यावर स्वतंत्र कनेक्शन मिळण्याची शक्यता असते. त्यासाठी संबंधित गॅस वितरण कंपनीचे नियम आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं महत्त्वाचं आहे.

वेगळे रेशन कार्ड आणि स्वयंपाकघर आवश्यक

एकात घरातल्या दोन कुटुंबांना स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र स्वयंपाकाची व्यवस्था असल्याचं दाखवावं लागू शकतं. यासाठी स्वतंत्र रेशन कार्ड आणि वेगळे स्वयंपाकघर असल्याचा पुरावा महत्त्वाचा ठरू शकतो. फक्त वेगळं रेशन कार्ड असल्यामुळे दुसरं कनेक्शन मिळेलच असं नाही. संबंधिक गॅस कंपनीकडून अर्जाची तपासणी केली जाऊ शकते.

दुसरे LPG कनेक्शन मिळवण्यासाठी अटी

दुसऱ्या गॅस कनेक्शनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. आधार कार्ड किंवा कंपनीने मान्य केलेले अन्य ओळखपत्र आवश्यक असू शकते. तसेच भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीला पत्ता आणि निवासाचा पुरावा द्यावा लागू शकतो. संबंधित कंपनीच्या नियमानुसार स्वतंत्र कुटुंबाचा पुरावा मागितला जाऊ शकतो. अर्जदाराची ओळख आणि पत्त्याची पडताळणी पूर्ण करावी लागते. ISI मानांकन असलेली शेगडी आणि योग्य LPG होस वापरणं आवश्यक आहे.

गॅस कंपनीकडून पडताळणी होऊ शकते

एकाच पत्त्यावर आधीपासून गॅस कनेक्शन असेल तर नवीन अर्जाची तपासणी केली जाऊ शकते. आवश्यकतेनुसार कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन स्वतंत्र स्वयंपाकघर आणि कुटुंबाची माहिती तपासू शकतात. अर्ज मंजूर होण्यापूर्वी अतिरिक्त कागदपत्रेही मागितली जाऊ शकतात.

KYC का महत्त्वाची आहे?

KYC म्हणजे ग्राहकाची ओळख आणि पत्ता पडताळण्याची प्रक्रिया आहे. एकाच पत्त्यावर दोन कनेक्शनसाठी अर्ज करताना ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरते. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज रखडू शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठा उलटफेर! दोन दिवसांच्या घसरणीनंतर जळगावात दरात मोठी वाढ; पाहा ताजे दर

BP Tips: सायलेंट किलर BPचा धोका कमी करायचाय? या ५ गोष्टी ठेवा लक्षात

Maharashtra News Live Update : चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांना बंदी; वाहतुकीत मोठा बदल

Kaju Khanyache Fayde: 1 महिना दररोज काजू खाल्ले तर शरीरात काय बदल होईल?

Nashik Traffic: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणामुळे नाशिकमध्ये वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT