car loan canva
बिझनेस

Loan Repayment Rules: लोन न भरल्यास बँक कर्मचारी तुमची गाडी जप्त करू शकतात का? काय सांगतो नियम?

Loan Recovery Process: बऱ्याचदा लोन घेतल्यानंतर पैसे फेडले जात नाहीत, त्यामुळे बँक कर्मचारी तुमची वस्तू जप्त करु शकतात का? तुमच्यावर काय कारवाई करु शकतात? जाणून घ्या.

Ankush Dhavre

जेव्हापासून EMI हा पर्याय उपलब्ध झाला आहे, तेव्हापासून घर, मोबाईल आणि गाडी घेणं जरा सोपं झालं आहे. सुरुवातीला अर्धी रक्कम भरुनही घर किंवा गाडी घेता येत होती. मात्र आता झिरो डाऊनपेमेंटचा ऑप्शन आल्यामुळे EMI वर खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे.

आपण EMI जर वेळेत भरले नाहीतर, बँक चार्जेत लावते. मात्र चार्जेस लावूनही जर पैशांची परतफेड केली नाहीतर बँक कर्मचारी आपण घेतलेल्या वस्तूचा ताबा घेतात. मात्र बँकेकडे खरंच हा अधिकार असतो का ? नियम काय सांगतो? जाणून घ्या.

जर तुम्ही घेतलेल्या वस्तूचे EMI वेळेत फेडले नाही, तर बँकेकडे तुमची गाडी जप्त करण्याचा अधिकार असतो. मात्र त्याचे काही नियम असतात.

लोन अटींचे उल्लंघन

ज्यावेळी आपण लोन घेतो, त्यावेळी त्यावर स्पष्टपणे लिहिलेले असते की जर तुम्ही लोनची रक्कम वेळेत भरली नाहीतर, गाडी जप्त केली जाऊ शकते. मात्र गाडी जप्त करण्यापूर्वी बँक तुम्हाला नोटीस पाठवते.

नोटीस देणे आवश्यक

गाडी जप्त करण्याआधी बँकेकडून किमान ६० दिवसांची नोटीस दिली जाते. ही प्रक्रिया लागू करण्यापू्र्वी तुम्हाला बँकेकडून नोटीसा पाठवल्या जातात. जर तुम्हाला लोन फेडण्यासाठी आणखी वेळ हवा असेल, तर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता.

कशी असते प्रक्रिया

बँक तुमची गाडी थेट जप्त करु शकत नाही. ही प्रक्रिया तिसऱ्या पक्षाच्या एजेन्सीद्वारे पार पाडली जाते. जर तुम्हाला ही प्रक्रिया अनुचित वाटत असेल, तर तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता. यासह बँकेविरोधात ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार दाखल करता येते.

बँक जप्त केलेली गाडी विकण्याचा अधिकार ठेवते. विक्रीतून मिळालेली रक्कम लोन चुकतीसाठी वापरली जाते.गाडी विकल्यानंतर जर लोनची रक्कम पूर्ण भरली गेली नाही, तर उर्वरित रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KTM 160 Duke: केटीएमची भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

SCROLL FOR NEXT