CAG REPORT ON FAKE HALLMARKED GOLD saam tv
बिझनेस

सोनं खरेदी करताय सावधान! हॉलमार्क सोनंही बोगस असू शकतं

83% of Registered Jewellery Shops: तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर सावधान....कारण तुमचं सोनं हॉलमार्कचं असलं तरी ते बोगस असू शकतं....तुम्हाला बसला ना धक्का? हे आम्ही नव्हे तर कॅगचं म्हणतंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

घरात सण-समारंभ, लग्नकार्य असो की सुरक्षित गुंतवणूक, प्रत्येक भारतीयांचा सोने खरेदीकडे कायम कल असतो. आणि त्यात सोन्यावर शुद्धतेची हमी देणारा ‘हॉलमार्क’ पाहिला की ग्राहक डोळे मिटून खरेदी करतो. मात्र, हॉलमार्क असलेलं सोनंही बोगस असू शकतं... होय... देशाची सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था अर्थात कॅगनं हादरवून टाकणारा अहवाल दिलाय. सोन्याच्या शुद्धतेवर देखरेख करणारी संस्था भारतीय मानक ब्यूरो(BIS)च्या निष्काळजीपणावर कॅगनं अक्षरशः ताशेरे ओढलेत.

कॅगच्या अहवालात नेमकं काय?

BIS ही संस्था सोन्याच्या शुद्धतेची देखरेख करते

BISने वर्षातून कमीत कमी एकदा सर्व रजिस्टर्ड ज्वेलर्सच्या दुकानात जायला पाहिजे

5 वर्षांत 83 टक्क्यांहून अधिक सोन्याची दुकानं तपासलीच नाही

28 हजार 865 परवानाधारक ज्वेलर्सपैकी 5 हजार 444 सराफा दुकानांची तपासणी

हॉलमार्किंग केंद्रातही पडताळणी नाही

कॅगच्या अहवालामुळे सोने खरेदीत सामान्य ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. इतकंच नव्हे तर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची चिन्हे आहेत...

ग्राहकांच्या खिशाला झळ

देशात बिना हॉलमार्कचं सोनं विकणं पूर्णपणे बेकायदा

देशभरात सुमारे 2.3 लाख सोन्याची दुकाने BIS कडे नोंदणीकृत

फसवणूक होऊ नये म्हणून सरकारकडून हॉलमार्किंग अनिवार्य

80 टक्के ज्वेलर्स दुकानांची तपासणीच होत नाही

हॉलमार्किंग केंद्रात सोन्याची शुद्धता तपासल्यावर 6 आकडी युनिक नंबर देतात

तर दुसरीकडे, ग्राहकांची चिंता वाढली असली तरी सराफा व्यावसायिकांनी मात्र कॅगच्या अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलंय... देशात हॉलमार्कविना सोनं विकणं बेकायदा आहे. देशभरात सुमारे 2 लाखांहून अधिक सोन्याची दुकाने BIS कडे नोंदणीकृत आहेत. मात्र, 83 टक्क्यांहून अधिक सोन्याची दुकाने तपासलीच नसल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडालीये. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचं कारण दिलं असलं तरी BISची ही सबब कॅगनं फेटाळून लावलीये. कॅगचा हा रिपोर्ट संसदेत मांडला जाणार आहे. त्यामुळे सरकार यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यकलाकाराचं निधन; नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा

दादांची नाक रगडून माफी मागा; उद्धव ठाकरेंचा शाहांना टोला, पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण तापलं

MBBSसाठी NEETसोबत 12वीचे गुणही महत्त्वाचे? अनेक राज्यांचा निलेकणी समितीकडे प्रस्ताव

Maharashtra News Live Update: मायक्रो फायनान्सच्या एजंटची मुजोरी!

दिवाळीनंतर महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात मोठी वाढ; वाहनचालकांचे बजेट कोलमडलं!

SCROLL FOR NEXT