Gold Buy On Credit Card saam Tv
बिझनेस

Gold Purchase: क्रेडिट कार्डने सोने खरेदी करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

Gold Buy On Credit Card: जर तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ सुधारण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करायची असेल. तसेच क्रेडिट कार्डद्वारे सोने खरेदी करायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Bharat Jadhav

सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. विशेषतः भारतात लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. पूर्वी, सराफा बाजारात ते खरेदी करण्यासाठी फक्त रोख रक्कम वापरली जात असायची. परंतु काळानुसार बदल झाल्यामुळे, आता तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे देखील सोने खरेदी करू शकता. क्रेडिट कार्डद्वारे सोने खरेदी करणे सोपे आहे, परंतु त्याचे फायदे आणि तोटे माहिती असणं आवश्यक आहे.

या बातमीत तुम्हाला नफा आणि तोट्याबद्दल सांगणार आहोत. कार्ड स्वाइप करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे माहिती असणं आवश्यक आहे. एफपीए एज्युटेकचे संचालक सीए प्रणीत जैन यांच्या मते, मिंटच्या अहवालात, वेळेवर पेमेंट करणाऱ्या लोकांसाठी क्रेडिट कार्ड योग्य आहे. जर तुम्ही वेळेवर पेमेंट करण्यात चुकलात तर ३६-४२% वार्षिक व्याज, विलंब शुल्क, जीएसटी आणि इतर शुल्कांचा भार सहन करावा लागेल.

क्रेडिट कार्डचा एक आकर्षक गोष्ट म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स जमा करणे. परंतु वेळेवर पैसे न भरल्याने मोठा पश्चात्ताप होऊ शकतो. म्हणून क्रेडिट कार्डने गुंतवणूक करणे टाळा. आता क्रेडिट कार्डने सोने खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे समजून घेऊया.

कोणत्या कार्डवर मिळतात फायदे?

क्रेडिट कार्डने सोने खरेदी केल्याने रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकसारखे अनेक आकर्षक फायदे मिळत असतात. झोया, तनिष्क आणि रिलायन्स ज्वेल्स सारखे प्रसिद्ध ब्रँड क्रेडिट कार्ड वापरून सोने खरेदीवर ५% पर्यंत कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्स देतात. टायटन एसबीआय क्रेडिट कार्ड तनिष्ककडून सोने खरेदीवर ३% पर्यंत मूल्य परतफेड आणि इतर निवडक दागिन्यांच्या ब्रँडवर ५% पर्यंत कॅशबॅक देत असते.

स्टँडर्ड चार्टर्ड अल्टीमेट क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी रीगालिया गोल्ड क्रेडिट कार्ड सारखी कार्डे देखील सोन्याच्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स देतात. याचा वापर भविष्यातील सवलती किंवा इतर फायद्यांसाठी केला जाऊ शकतो.

क्रेडिट कार्डने सोने खरेदी करण्याचे तोटे

क्रेडिट कार्डने सोने खरेदी करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे प्रक्रिया शुल्क, ज्याला स्वाइप शुल्क असेही म्हणतात. प्रत्येक व्यवहारावर हे शुल्क ३.५% किंवा त्याहून अधिक असू शकते. सोन्याच्या किमती आधीच खूप जास्त आहेत आणि या अतिरिक्त शुल्कामुळे खरेदीदारांवर आर्थिक भार आणखी पडत असतो.

जर तुम्ही आंतरराष्ट्रीय सोने विक्रेत्यांकडून सोने खरेदी केले तर तुम्हाला परदेशी व्यवहार शुल्क देखील भरावे लागू शकते. क्रेडिट कार्डने सोने खरेदी करण्यापूर्वी, आणि काही जोखीम टाळण्यासाठी तुमचं कार्ड प्रदात्याच्या नवीनतम ऑफर,अटी आणि शर्तींबद्दल संपूर्ण माहिती घेणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT