BSNL Recruitment Saam Tv
बिझनेस

BSNL Recruitment: बीएसएनएलमध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

BSNL Recruitment 2026: बीएसएनएलनध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बीएसएनएलमध्ये नोकरीची संधी

सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती

पगार किती मिळणार?

भारतीय सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलने भरती जाहीर केली आहे. सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

बीएसएनएल ही कंपनी भारत सरकारअंतर्गत येते. या कंपनीत नोकरी करता येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही www.bsnl.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ७ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत अर्ज करु शकतात.

बीएसएनएलमध्ये एकूण १२० पदांसाठी भरती केली जाणार आहे. सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदे भरली जाणार आहे. यामध्ये टेलिकॉम स्ट्रीमसाठी ४० जागा आहेत. फायनान्स स्ट्रीमसाठी ११ जागा आहेत. या नोकरीसाठी तुम्हाला या bsnl.co.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

बीएसएनएलमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मेरिट लिस्ट, कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,९०० ते ५०,५०० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता (Eligibility)

बीएसएनएलमध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेन टेलिकॉम ऑपरेशन्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स/कंप्यूटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन में बॅचलर ऑफ इंजिनियरिंग/बॅचलर ऑफ टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

फायनान्समध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंसी (CMA)पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT